ENG vs AUS: इंग्लंडच्या टीमला नेट प्रॅक्टिसमध्ये ‘तेंडुलकर’ची मदत

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 25, 2019 | 14:42 IST | टाइम्स नाऊ हिंदी

England vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचसाठी इंग्लंडनं कंबर कसून तयारी केली आहे. या तयारीत सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुननं इंग्लंडच्या बॅट्समनना नेटमध्ये बॉलिंग प्रॅक्टिस देऊन सगळ्यांच लक्ष वेधलं आहे.

Arjun Tendulkar
अर्जुन तेंडुलकरनं दिलं इंग्लंडला प्रॅक्टिस   |  फोटो सौजन्य: Twitter

लंडन: आज, वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एक हायप्रोफाईल मॅच होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉर्मेटनुसार होत आहे. त्यात प्रत्येकजण सहभागी प्रत्येक टीमविरुद्ध एक मॅच खेळणार आहे. त्यामुळं भारत-पाकिस्तान, न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया असे हाय प्रोफाईल गेम पहायला मिळत आहेत. आज त्यातलीच एक चांगली मॅच आपल्याला पहायला मिळण्याची शक्यता आहे. अनेकदा कोण जिंकला कोण हरला, या पेक्षा चांगलं क्रिकेट पहायला मिळालं एवढीच चाहत्यांची अपेक्षा असते. या चांगल्या क्रिकेटसाठी तयारीही तितकीच चांगली करावी लागते.

सध्याच्या घडीला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही तोलामोलाच्या टीम आहेत. ऑस्ट्रेलियानं भारता विरुद्ध तर इंग्लंडनं पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारला आहे. श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारल्यामुळं इंग्लंडसाठी थोडं गणित अवघड झालं असल्यामुळं त्यांना कोणत्याही परिस्थितीत ही मॅच जिंकावी लागणार आहे आणि म्हणूनच इंग्लंडनं कंबर कसून तयारी केली आहे. या तयारीत एका तेंडुलकरनं त्यांना मदत केलीय. अर्थातच हा सिनिअर सचिन तेंडुलकर नाही तर, ज्युनिअर अर्जुन तेंडुलकर आहे.

दुसऱ्यांदा इंग्लंडसाठी बॉलिंग

सगळ्यांना माहिती आहे की, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन उत्तम लेफ्ट आर्म फास्ट बॉलर आहे. या नवोदित बॉलरनं इंग्लंडच्या टीमला नेट प्रॅक्टिसमध्ये बॉलिंग करून सराव दिलाय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्डसवर मॅच होत असून, त्यासाठी मैदानावर इंग्लंडनं कसून सराव केला. त्यात इंग्लंडच्या बॅट्समनना लेफ्ट आर्म बॉलिंगचा सराव देणारा अर्जुन तेंडुलकर लक्षवेधी ठरला आहे. त्यावेळी इंग्लंडच्या कोचिंग टीमचा भाग असलेला महान स्पिन बॉलर सकलेन मुश्ताकही उपस्थित होता. मुश्ताकच्या मार्गदर्शनाखाली अर्जुननं इंग्लंडला सराव दिला आहे. मुळात अर्जुननं इंग्लंडसाठी हे पहिल्यांदाच केलंय, असं नाही. यापूर्वी त्यानं २०१५मध्ये अॅशेस सिरीजसाठी तयार करणाऱ्या इंग्लंडला बॅटिंग प्रॅक्टिसमध्ये मदत केली होती. त्यावेळी अर्जुन केवळ १५ वर्षांचा होता.

अर्जुनचा हा बॉल पाहिला का?

अर्जुनने गेल्या आठवड्यात एमसीसी यंग क्रिकेटर्सच्या वतीने एका मॅचमध्ये बॉलिंग केली होती. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट बॉलिंग करणाऱ्या अर्जुननं ओपनर नॅथन टिली याला एका चांगल्या बॉलवर बोल्ड केलं. त्या मॅचमध्ये १९ वर्षांच्या अर्जुननं दोन विकेट घेतल्या होत्या. त्याच्या बॉलिंगचं उपस्थितांनी खूप कौतुक केलं होतं. अर्जुननं भारताच्या अंडर १९च्या टीमकडून श्रीलंकेविरुद्ध यूथ टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली होती. तसचं मुंबई टी-२०मध्येही भाग घेतला होता. कुच बिहार ट्रॉफीमध्ये अर्जुननं मुंबईकडून खेळताना १९ विकेट्स घेतल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ENG vs AUS: इंग्लंडच्या टीमला नेट प्रॅक्टिसमध्ये ‘तेंडुलकर’ची मदत Description: England vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचसाठी इंग्लंडनं कंबर कसून तयारी केली आहे. या तयारीत सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुननं इंग्लंडच्या बॅट्समनना नेटमध्ये बॉलिंग प्रॅक्टिस देऊन सगळ्यांच लक्ष वेधलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola