जाणून घ्या सट्टाबाजारनुसार भारत-पाक मॅचमध्ये कोण होणार विजयी?

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 16, 2019 | 17:19 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

भारत-पाकिस्तान मॅचवर जशी सर्वांची नजर आहे. तशीच नजर सट्टाबाजाराचीही आहे. आजच्या मॅचवर कोट्यवधींचा सट्टा लागलाय. जाणून घ्या सट्टाबाजारनुसार कोण मारणार बाजी?

India Vs Pakistan
भारत-पाकिस्तान मॅचवर कोट्यवधींचा सट्टा  |  फोटो सौजन्य: AP

नवी दिल्ली: आयसीसी वर्ल्डकप २०१९ मधील सर्वात मोठ्या महामुकाबल्यावर जशी प्रेक्षक आणि क्रिकेट फॅन्सची नजर आहे. तसाच सट्टाबाजारही सध्या खूप तेजीत आहे. सट्टेखोरांची नजर भारत-पाक मॅचवरील प्रत्येक बॉल आणि रनवर आहे. मँचेस्टरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचवर जबरदस्त सट्टा लागलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅचवर दिल्ली एनसीआरमध्ये लागलेला सट्टा हा १०० कोटींच्यावर गेलेला आहे. फरीदाबाद, गाझियाबाद, नोएडा आणि गुरुग्रामसारख्या दिल्ली शेजारील शहरांमध्ये सट्टाबाजांचं नेटवर्क खूप मजबूत आहे.

पोलीस उपायुक्त मधुर वर्मा यांनी आयएएनएस सोबत बोलतांना सांगितलं, ‘रविवारी भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या मॅचवर लागणाऱ्या सट्ट्यावर आमची संपूर्ण नजर असणार आहे. आम्ही प्रत्येक बाजूनं त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. फाईव्ह स्टार हॉटेल, गेस्ट हाऊस, विशेष म्हणजे करोल बाग आणि जुनी दिल्ली परिसरात आमची सर्वांवर करडी नजर असणार आहे. कारण हे भाग मोठ-मोठ्या सट्टेखोरांच्या नजरेत असतात. या लोकांचं नेटवर्क खूप स्ट्राँग आहे जे पकडणं खूप कठीण असतं, मात्र आम्ही आपलं काम करतोय.’

पोलिसांनी उत्तर दिल्लीतील काही मोठ्या जुगार खेळणाऱ्यांना पकडलं होतं. ज्यांच्याजवळ एक इंटरनेट सॉफ्टवेअर होतं जे जुगारासाठी फोनवरून जोडलेलं होतं, असं दिल्ली पोलीस आयुक्त वर्मा यांनी सांगितलं.

भारत-पाकिस्तान मॅचमध्ये सट्टाबाजारानुसार भारताचा पगडा भारी दिसतोय. जुगार हा फक्त मॅचच्या निकालावर नाही तर प्रत्येक बॉल आणि एका-एका ओव्हर, एका-एका रनवर आणि प्रत्येक विकेटवर लागतो. तर सट्टेखोरानं आयएएनएस सोबत बोलतांना सांगितलं, ‘आयपीएल मॅचसारखी या वर्ल्डकपमध्ये सुद्धा कॉलेजचे विद्यार्थी, व्यावसायिक, हॉटेलचे मालक, क्रिकेटचे फॅन्स, व्यापारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला, हवाला व्यावसायिक हे आमच्या सोबत असल्याचं त्यानं सांगितलं.’ ६० टक्क्यांहून अधिक सट्टेखोरांनी भारतच्या विजयावर जुगार लावला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूची सट्टाबाजारात एक किंमत ठरलेली आहे. उदाहरणार्थ जसप्रीत बुमराहसाठी १५ रुपये आणि मोहम्मद आमिरसाठी सहा रुपये सट्टाबाजारात ठरलेली किंमत आहे.’

तसंच कोणता क्रिकेटपटू हाफ सेंच्युरी करेल आणि कोण सेंच्युरी यावरही सट्टेबाजारात किंमत ठरलीय. उदाहरण द्यायचं झाल्यास टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा बाबर आझम आणि फखर जमन यांच्यावर बाजारात जोरदार सट्टा लागलाय.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
जाणून घ्या सट्टाबाजारनुसार भारत-पाक मॅचमध्ये कोण होणार विजयी? Description: भारत-पाकिस्तान मॅचवर जशी सर्वांची नजर आहे. तशीच नजर सट्टाबाजाराचीही आहे. आजच्या मॅचवर कोट्यवधींचा सट्टा लागलाय. जाणून घ्या सट्टाबाजारनुसार कोण मारणार बाजी?
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola