India vs Pakistan: पाकिस्तानचा कॅप्टन सरफराजनं पाहा मैदानावर काय केलं? सोशल मीडियावर झाला ट्रोल

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 17, 2019 | 14:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Pakistan: पाकिस्तानचा कॅप्टन आणि विकेटकीपर सरफराज अहमदची जगभरातून खिल्ली उडवण्यात येत आहे. सोशल मीडियावर तर, त्याच्या या कृत्यानं हास्याचे लोट उसळले आहेत. क्रिकेटमध्ये बहुदा पहिल्यांदाच हा प्रकार घडला.

pakistan captain sarfraz ahmed
पाकिस्तानचा जांभया देणारा कॅप्टन   |  फोटो सौजन्य: Twitter

मँचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान मॅच म्हणजे, हायव्होल्टेज मॅच.  भारतानं काल यंदाच्या वर्ल्ड कपमधील २२व्या आणि आपल्या चौथ्या मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला. भारतानं वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत करण्याची मालिका कायम ठेवली आहे. पाकिस्तानचा कॅप्टन सरफराज अहमद यानं टॉस जिंकून पहिल्यांदा भारताला बॅटिंग दिली. पण, त्याचा हा निर्णय त्याचा बोलर्सनी सार्थ ठरवला नाही. भारताच्या सलामी जोडीनं १३६ रन्स केल्या आणि त्यानंतर केएल राहुल आऊट झाला. राहुल आऊट होण्याच्या आधी आणि नंतरही मैदानावर सरफराज अहमद खूप अॅक्टिव्ह दिसत होता. पण, काही वेळानंतर त्यानं असं काही केलं की, जगभरातून त्याची खिल्ली उडवण्यात आली. सोशल मीडियावर तर, त्याच्या या कृत्यानं हास्याचे लोट उसळले आहेत. क्रिकेटच्या मैदानावर बहुदा पहिल्यांदाच असा प्रकार घडला असावा. भारत-पाकिस्तानसारख्या हायव्होल्टेज मॅचमध्ये हे घडलंय हे विशेष म्हणावं लागेल.

 

 

 

 

पाकचा कॅप्टन जांभई देऊ लागला 

भारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट होतं. दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. अंदाजाप्रमाणं पाऊसही झाला. भारतानं ४४-४५ ओव्हरचा खेळ केल्यानंतर पाऊस आला. जवळपास अर्धा-पाऊण तासाचा खेळ वाया गेल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला. त्यावेळी पाकिस्तानचा कॅप्टन सरफराज फिल्डिंग लावताना दिसत होता. अचानक त्यानं जांभया द्यायला सुरुवात केली. टीव्ही कॅमेऱ्यांनी त्याच्या जांभया अचूक पकडल्या. तर काहींनी टीव्हीवरून त्याच्या जांभईचे व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर झाले. या जांभयांवरून सरफराज अहमद सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला, आज दुसऱ्या दिवशीही सरफराजच्या जांभयांचे ट्वीट पडत आहेत. सरफराजच्या जांभया अशा होत्या की जणू त्याला काही चिंताच नव्हती. पावसाच्या ब्रेकमध्ये ड्रेसिंग रूममध्ये तो बहुदा एखादी डुलकी काढून आला असावा, असा अंदाज काहीजण व्यक्त करत होते.

 

 

 

 

पाकचा आळशी कॅप्टन 

सरफराजच्या आळशीपणामुळेच भारतानं ३३६ रन्स केल्या आणि पाकिस्तानपुढं तगडं आव्हान उभं केलं. शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये भारतानं आणखी रन्स करणं अपेक्षित होतं. पण, ते झालं नाही. सरते शेवटी पाकिस्तानपुढं ३३७ रन्सचं टार्गेट होतं. पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध रन्सचा पाठलाग करताना सरफराज आणि वाहाब रियाझनं शेवटच्या काही ओव्हार्समध्ये चांगली फटकेबाजी करून रंगत आणली होती. पण, या मॅचमध्ये जसा सरफराज, कॅप्टन्सीमध्ये कमी पडाल तसा तो बॅटिंगमध्येही कमी पडला. ३० बॉल खेळून तो केवळ १२ रन्स करू शकला. त्यात त्याला एकही बाऊंड्री मारता आली नाही. भारतानं ही मॅच डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ रन्सनी जिंकली आहे. भारताचा पाकिस्तानवरचा वर्ल्ड कपमधील हा सातवा विजय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
India vs Pakistan: पाकिस्तानचा कॅप्टन सरफराजनं पाहा मैदानावर काय केलं? सोशल मीडियावर झाला ट्रोल Description: India vs Pakistan: पाकिस्तानचा कॅप्टन आणि विकेटकीपर सरफराज अहमदची जगभरातून खिल्ली उडवण्यात येत आहे. सोशल मीडियावर तर, त्याच्या या कृत्यानं हास्याचे लोट उसळले आहेत. क्रिकेटमध्ये बहुदा पहिल्यांदाच हा प्रकार घडला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola