IND vs WI: टीम इंडीयाचा वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी दणदणीत विजय

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 27, 2019 | 23:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs WI Score, ICC World Cup 2019: वर्ल्ड कप 2019 मध्ये आज टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात मॅच होत आहे. या मॅचचा स्कोअर आणि ताजे अपडेट्स पाहा.

IND vs WI
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 

मॅन्चेस्टर: टीम इंडियानं आईसीसी वर्ल्ड कप २०१९च्या ३४व्या सामन्यात वेस्ट इंडिजला १२५ रन्सनी पराभूत केलं.  या विजयानंतर टीम इंडियाचे ११ पॉईंट्स झाले आहेत. टीम इंडिया आता रविवारी होणाऱ्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करण्यात यशस्वी झाली तर, टीम पहिल्या टॉप फोरमध्ये स्थान प्राप्त होईल. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करत २६८ रन्सचे आव्हान वेस्ट इंडिजसमोर ठेवलं होतं. तर वेस्ट इंडिजच्या टीमनं ३४.२ ओव्हरमध्ये १४३ रन्स करत ऑल आऊट झाले. 

वेस्ट इंडिजच्या बॅटिंगची सुरूवात निराशाजनक झाली. वेस्ट इंडिजचा सलामीवीर क्रिस गेल १९ बॉल खेळत ९ धावांवरच मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर पॅव्हेलियनमध्ये परतला. तर सुनिल अॅम्बिस केवळ ४० रन्समध्ये ३१ रन्स करू शकला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शाई होपनं १० बॉलमध्ये ५ रन्स, निकोलस पुरणने ५० बॉलमध्ये २८ रन्स, शेम्रोन हेटमायरने २९ बॉलमध्ये १८ रन्स, तर कॅप्टन जेसन होल्डर अवघ्या ६ रन्सवर बाद झाला. आज टीम इंडियाच्या बॉलर्संनी चांगलं प्रदर्शन केलं. ३२.२ ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचे सर्व प्लेअर्स  पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात यश आलं. यावेळी यजुवेंद्र चहलनं वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक ५ विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शमीनं १६ रन्स देत वेस्ट इंडिजचे ४ बॅट्समन बाद केले. तर हार्दिक पांड्यानं ३ खेळाडूंना आऊट केले. तसंच कुलदीप यादव आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी एक-एक खेळाडूला बाद केलं असून टीम इंडियाचा हा विजय यंदाच्या टुर्नामेंटमधील पाचवा विजय आहे. 

मॅन्चेस्टरमध्ये भारताताने वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात सामन्य खेळ करत केवळ २६८ धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडिजला २६९ धावांची गरज आहे. वेस्ट इंडिज गोलंदाजींनी भारतीय फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवले होते. त्यांना धावा काढताना खूप सामना करावा लागत होता.  भारताकडून सर्वाधिक धावा कर्णधार विराट कोहलीने केल्या. 

भारताची डावाची सुरूवात डळमळीतच झाली. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा १३ धावांवर असताना किमा रोन्चच्या गोलंदाजीवर शाई होपकरवी झेलबाद झाला. हा निर्णय जरा वादग्रस्त होता. वेस्ट इंडिजने याचा रिव्ह्यू घेतला होता. त्यामुळे बॅट आणि पॅटमधील या चेंडू कुठे चाटून गेला हे समजले नाही. त्यामुळे भारताला २९ धावांवर पहिला झटका बसला.  विराट कोहली आणि केएल राहुल यांची पार्टनरशीप होत असताना होल्डरचा मध्ये येणाऱ्या चेंडूवर राहुल त्रिफळाचित झाला. त्याने ४८ धावा केल्या. त्यानंतर ४ क्रमांकावर आलेल्या विजय शंकर खास काही करू शकला नाही. तो १४ धावांवर असताना किमा रोन्च च्या चेंडूवर शाई होपकडे झेल देत बाद झाला. त्यानंतर केदार जाधवही झटपट बाद झाला. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ४० धावांची पार्टनशीप केली. पण विराट कोहली एक चेंडू पूल करण्याच्या नादात होल्डरच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्यात ८ चौकारांचा समावेश आहे. 

यानंतर धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी अर्धशतकीय भागिदारी केली. हार्दिकने आपल्या स्टाइलमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण तो कनेक्ट करू शकला नाही. त्याने केवळ ५ चौकार लगावले. तो ४६ धावांवर कॉड्रेलच्या चेंडूवर झेल बाद झाला.  भारताकडून महेंद्रसिंग धोनी अखेरच्या षटकात ६ षटकार आणि एक चौकारांसह आपले अर्धशतक साजरे केले. धोनीने नाबाद ५६ धावा केल्या.

कुणाचं पारड जड?

आतापर्यंतच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज या दोन्ही टीममध्ये आठ मॅचेस झाल्या आहेत. त्यापैकी पाच मॅचेस भारताने जिंकल्या आहेत तर तीनवेळा वेस्ट इंडिजने विजय मिळवला आहे. या एकूण आठ मॅचेसपैकी तीन मॅचेस या 1983 च्या वर्ल्ड कप दरम्यान झाल्या होत्या. ज्यामध्ये दोन मॅचेस भारताने जिंकल्या होत्या तर वेस्ट इंडिजने एक मॅच जिंकली होती.

 

लाईव्ह हायलाईट्स

वेस्ट इंडिजचा डाव

 1. टिम इंडीयाचा वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी दणदणीत विजय.
 2. वेस्ट इंडिजला दहावा धक्का, मोहंमद शमीच्या गोलंदाजीवर ओशेन थॉमस बाद. 
 3. वेस्ट इंडिजचा नववा गडी तंबूत परतला. यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर शेल्डन कॉट्रेल एलबीडब्ल्यु. 
 4. वेस्ट इंडिजला आठवा धक्का, शॉम्रॉन हेटमायर बाद. मोहंमद शमीच्या गोलंदाजीवर लोकेश राहूने घेतला कॅच.
 5. वेस्ट इंडिजला सातवा धक्का, बुमराहची भेदक गोलंदीजीवर फॅबिअन अॅलन बाद.
 6. वेस्ट इंडिजला सहावा धक्का, कार्लोस ब्रॅथवेट बाद. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनीने घेतला कॅच.
 7. वेस्ट इंडिजची धावसंख्या: २५ ओव्हरमध्ये १०१ रन्स, ५ विकेट
 8. टीम इंडियाला पाचवे यश, कर्णधार जेसन होल्डर बाद. यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर केदार जाधवने घेतला कॅच.
 9. वेस्ट इंडिजची धावसंख्या: २१ ओव्हरमध्ये ८४ रन्स, ४ विकेट
 10. टीम इंडियाला चौथे यश, निकोलस पूरन बाद. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोहंमद शमीने घेतला कॅच.   
 11. टीम इंडियाला तिसरे यश, हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सुनील अॅम्ब्रिज बाद.
 12. वेस्ट इंडिजचे अर्धशतक पूर्ण, १५ ओव्हरमध्ये ५० रन्स पूर्ण.
 13. वेस्ट इंडियाची धावसंख्या: १० ओव्हरमध्ये २९ रन्स, २ विकेट
 14. टीम इंडियाला दुसरे यश मोहंमद शमीच्या गोलंदाजीवर शाई होप बाद. 
 15. टीम इंडियाला पाहिलं यश क्रिस गेल बाद. मोहंमद शमीच्या गोलंदाजीवर केदार जाधवने घेतला कॅच.
 16. वेस्ट इंडिजला विजयसाठी २६९ रन्सची गरज
 17. वेस्ट इंडिजचा डाव सुरू 

टीम इंडियाचा डाव

 1. टीम इंडियाची धावसंख्या: ५० ओव्हरमध्ये २६८ रन्स, ७ विकेट

 2. टीम इंडियाला सातवा धक्का, मोहंमद शमी बाद. शेल्डेन कॉर्ट्रेलच्या गोलंदाजीवर शाई होपने घेतला कॅच 

 3. टीम इंडियाला सहावा धक्का, हार्दिक पांड्या बाद. शेल्डेन कॉर्ट्रेलच्या गोलंदाजीवर फॅबियन अॅलनने घेतला कॅच 

 4. टीम इंडियाचे ४२ ओव्हरमध्ये २०० रन्स पूर्ण

 5. टीम इंडियाला पाचवा धक्का विराट कोहली बाद. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर डॅरेन ब्राव्होने घेतला कॅच. 

 6. टीम इंडियाच्या ३१.१ ओव्हरमध्ये १५१ रन्स

 7. टीम इंडियाला चौथा धक्का केदार जाधव बाद. केमार रोचच्या गोलंदाजीवर शाय होपने घेतला कॅच.  

 8. विराट कोहलीचे अर्धशतक, त्याने ५५ बॉलमध्ये ५० रन्स काढले.

 9. टीम इंडियाला तिसरा धक्का, विजय शंकर बाद. केमार रोचच्या गोलंदाजीवर शाय होपने घेतला कॅच.

 10. टीम इंडियाचे शतक पूर्ण २२ ओव्हरमध्ये १०० रन्स 

 11. टीम इंडियाला दुसरा धक्का, जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल बाद.

 12. टीम इंडियाचे अर्धशतक पूर्ण, १०.३ ओव्हरमध्ये ५१ रन्स ; एक विकेट

 13. रोहित शर्मा १८ रन्सवर आऊट
 14. रोहित शर्मा आऊट
 15. टीम इंडियाला पहिला धक्का
 16. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय
 17. टीम इंडियाने जिंकला टॉस 

 

टीम

टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत.

वेस्ट इंडिज टीम: जेसन होल्डर (कॅप्टन), ख्रिस गेल, इव्हिन लेक्सि, शाय होप, डॅरेन ब्राव्हो, शॉम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन, सुनील अॅम्ब्रिज, कार्लोस ब्रॅथवेट, फॅबिअन अॅलन, अॅश्ले नर्स, शॅनन गॅब्रिएल, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस, केमार रोच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IND vs WI: टीम इंडीयाचा वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी दणदणीत विजय Description: IND vs WI Score, ICC World Cup 2019: वर्ल्ड कप 2019 मध्ये आज टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात मॅच होत आहे. या मॅचचा स्कोअर आणि ताजे अपडेट्स पाहा.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola