सेमीफायनलमधील पराभवाचे पंतप्रधान मोदींनाही दु:ख; ट्विटवरून भावनांना करुन दिली मोकळी वाट

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 11, 2019 | 00:09 IST | टाइम्स नाऊ हिंदी

India Out of world cup: भारताच्या पराभवाचे दुःख सगळ्यांनाच झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्र्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे. पंतप्रधान मोदींनी टीमला भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

PM Narendra Modi file photo
सेमीफायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • सेमीफायनलमधील पराभवाचे पंतप्रधान मोदींनाही दुःख
  • खेळाडूंच्या जीगरबाज वृत्तीचे केले कौतुक
  • पराभवानंतर कॅप्टन विराट कोहलीही निराश

नवी दिल्ली : क्रिकेट वर्ल्ड कपची पहिली सेमीफायनल सोमवारी समाप्त झाली आणि भारताच्या वर्ल्ड कप प्रवासालाही पूर्ण विराम मिळाला. न्यूझीलंडनं भारताला १८ धावांनी मात दिली. भारत ही मॅच जिंकून वर्ल्ड कपही जिंकेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना होती. पण, चाहत्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले. भारतानं गुणतक्त्यात पहिला क्रमांक पटकावून अतिशय दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. सेमीफायनलमध्ये मात्र, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भारतापेक्षा चांगला खेळ करून विजय मिळवला. काही मिनिटांच्या खराब खेळामुळे वर्ल्ड कपचे स्वप्न धुळीस मिळाल्याचं मत, कॅप्टन विराट कोहलीनं व्यक्त केलं आहे. भारताच्या पराभवाचे दुःख सगळ्यांनाच झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे. पंतप्रधान मोदींनी आजच्या पराभवाला विसरून जाण्याचा सल्ला दिला असून, टीमच्या भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या पराभवानंतर ट्वीट केले आहे. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एक निराशाजनक निकाल लागला आहे. पण, शेवटपर्यंत टीम इंडियाची मेहनत आणि जिंकण्यासाठीची धडपड पाहून बरे वाटले. भारताने पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली, बोलिंग केली आणि फिल्डिंगही चांगली केली. मला त्यांच्यावर गर्व आहे. विजय आणि पराजय हा जीवनाचा एक भाग आहे. टीम पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. एका रंगतदार सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. मॅचेंस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली. भारतासमोर त्यांनी २४० रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. पण, भारताचा डाव २२१ रन्सवर संपुष्टात आला आणि भारताचं तिसऱ्यांदा विश्व कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

काय म्हणाला विराट कोहली?

वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर कॅप्टन विराट कोहली म्हणाला, ‘हा खूपच निराशाजनक पराभव झाला. पहिल्या हाफमध्ये आम्ही खूप चांगला खेळ केला होता. आम्हाला जे हवे होते ते आम्ही साध्य केले होते. आम्हाला माहिती होते की कालचा दिवस खूप चांगला गेला आहे. आज आमची वेळ आहे हे आम्हाला माहिती होते. त्यांच्या गोलंदाजांनी योग्य ठिकाणी टप्पा टाकून भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले होते. आजच्या खेळाचे श्रेय पूर्णपणे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना जाते. जडेजाने खूप चांगला खेळ केला. त्याला धोनीनं अतिशय समजूतदारपणे साथ दिली. मॅच हातात आली तेव्हाच धोनी रन आऊट झाला. केवळ ४५ मिनिटांच्या खराब खेळामुळे आम्ही वर्ल्ड कपमधून बाहेर पडलो. हे स्वीकार करणच अवघड आहे. पण, न्यूझीलंड विजयाच हक्कदार आहे. आम्हाला शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा करायला हवी. आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ केला. न्यूझीलंडने मोक्याच्या क्षणी धाडस दाखवल्यानं त्यांना विजयी होण्याचा हक्क आहे.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सेमीफायनलमधील पराभवाचे पंतप्रधान मोदींनाही दु:ख; ट्विटवरून भावनांना करुन दिली मोकळी वाट Description: India Out of world cup: भारताच्या पराभवाचे दुःख सगळ्यांनाच झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्र्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे. पंतप्रधान मोदींनी टीमला भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola