Mohammed Shami: मोहम्मद शमीला वगळण्यावरून वाद; पाहा त्याचे कोच काय म्हणाले

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 10, 2019 | 15:59 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

टीम इंडियाच्या सिलेक्शनवरून सोशल मीडियावर बरेच वादळ उठले आहे. वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करून आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या मोहम्मद शमीला टीमच्या बाहेर ठेवण्यावरून वाद सुरू आहे.

mohammed shami
शमीला वगळल्याने त्याचे कोच नाराज   |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • शमीला वगळल्यावरून सोशल मीडियावर नाराजी
  • शमीचे कोच बदरुद्दीने सिद्दिकीदेखील नाराज
  • शमी जखमी असल्याची शक्यता सिद्दिकी यांनी फेटाळली

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत असलेली वर्ल्ड कपची पहिली सेमीफायनल अजूनही सुरूच आहे. पावसामुळे मॅचमध्ये केवळ ४६ षटकांचा खेळ झाला आहे. आज पुन्हा पावसाचा अंदाज असल्यामुळं मॅच पुढे होणार की नाही याची शाश्वता अजूनही नाही. न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांनी आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देताना न्यूझीलंडचा जखडून ठेवले. पण, टीम इंडियाच्या सिलेक्शन वरून सोशल मीडियावर बरेच वादळ उठले आहे. वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करून आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या मोहम्मद शमीला टीमच्या बाहेर ठेवण्यावरून वाद सुरू आहे. त्यात त्यानं चांगली बॉलिंग करणाऱ्या शमीला बाहेर का बसवलं, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. सोशल मीडियावर शमीला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आता शमीचे प्रशिक्षण बदरूद्दीन सिद्दिकी यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

शमीनं स्वत:ला सिद्ध केलं

सिद्दिकीम म्हणाले, ‘शमीने या वर्ल्ड कपमध्ये चार मॅचमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेविरूद्ध अंतिम लीग मॅचमध्ये शमीला बाहेर ठेवण्यात आले. आतापर्यंत त्याला श्रीलंकेविरूद्ध विश्रांती दिल्याचं मानलं जात होतं. पण, सेमीफायनलमध्येही त्याला संघाबाहेर ठेवण्यात आल्यानं आश्चर्य वाटले. ज्या खेळाडूने तुमच्यासाठी चार मॅचमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्या खेळाडूला तुम्ही टीमबाहेर कसं काय ठेवू शकता.? तुम्ही एका वेगवाद गोलंदाजाकडून यापेक्षा काय अपेक्षा ठेवू शकता. मला वाटले होते. श्रीलंकेविरूद्ध आराम दिल्यानंतर शमी नॉकआऊटमध्ये पुन्हा संघात येईल. त्याला रिफ्रेश होण्यासाठी ब्रेक दिल्याचं वाटत होतं. पण, माझा अंदाज साफ चुकीचा ठरला.'

जखमी असल्याची शक्यता नाही

बॅटिंगमध्ये तळात भुवनेश्वर कुमार धावा काढू शकतो. यामुळे शमीला डावलून भुवनेश्वरला संधी दिल्याची चर्चा आहे. त्यावर सिद्दिकी म्हणाले, ‘तुम्ही जर, शमी किंवा भुवनेश्वरच्या बॅटिंगवर अवलंबून राहणार असाल तर, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही पराभतूच व्हाल. प्रामाणिकपणे सांगतो. जर, वरचे सहा जण तुमच्यासाठी रन्स करू शकले नाहीत तर बाकीचेही करणारच नाहीत. स्पर्धेच्या सुरूवातीला शमीला संधी देण्यात आली नाही. पण, जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे.’ सिद्दिकी यांनी शमी जखमी झाल्याची शंका फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, ‘वेस्ट इंडिजची मॅच झाल्यानंतर शमीशी बोलणं झालं होतं. त्यानंतर बोलणं झालं नाही. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करत होता. त्यात त्याच्या अनफिट होण्याचा प्रश्नच नाही. पण, या दोन दिवसांत काय झालं असेल तर मला माहिती नाही.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Mohammed Shami: मोहम्मद शमीला वगळण्यावरून वाद; पाहा त्याचे कोच काय म्हणाले Description: टीम इंडियाच्या सिलेक्शनवरून सोशल मीडियावर बरेच वादळ उठले आहे. वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करून आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या मोहम्मद शमीला टीमच्या बाहेर ठेवण्यावरून वाद सुरू आहे.
Loading...
Loading...
Loading...