ICC World cup 2019: न्यूझीलंडविरुद्ध असा आऊट झाला विराट, केली मोठी चूक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 27, 2019 | 13:33 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

World Cup 2019: भारतीय संघाला पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सहा विकेटनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यात कोहली लवकर बाद झाल्याने भारताचे मोठे नुकसान झाले.

virat kohi fail
विराट कोहली बाद  |  फोटो सौजन्य: AP

मुंबई: भारताने वर्ल्डकपआधी शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात पराभव पत्करला. न्यूझीलंडच्या क्रिकेटर्सनी दमदार कामगिरी करताना भारताला तीनही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. भारतीय संघाने रवींद्र जडेजाच्या ५४ धावांच्या जोरावर ३९.२ षटकांत केवळ १७९ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडच्या संघाने हे आव्हान केवळ ३७.१ षटकांत चार विकेट गमावत पूर्ण केले. 

ज्या गोष्टीची चिंता भारतीय फलंदाजांना सतावत होती ती सराव सामन्यात सिद्ध झाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजाच्या स्विंग आक्रमणासमोर भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहण्यात अपयशी ठरले. सुरूवातीला रोहित शर्मा २ धावांवर तर शिखर धवन २ धावांवर बाद झाला. लोकेश राहुलने स्विंग आक्रमणावर गुडघे टेकले आणि बोल्ड होत पॅव्हेलियनमध्ये परतला. 

भारताची यावेळी धावसंख्या तीन बाद २४ इतकी होती. संघाला कर्णधार विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र त्याला केवळ १८ धावा करता आल्या. कोलिन डि ग्रँडहोमच्या चेंडूवर तो बोल्ड झाला. कोहली ज्या पद्धतीने बाद झाला त्याच पद्धतीने अनेक दिग्गज खेळाडू बाद झाले होते. कोहलीची चूक ही होती की शॉट खेळताना त्याची बॅट आणि पॅड यांच्यात खूप जागा होती ज्यामुळे चेंडू आरामात विकेटमधून जाण्यास जागा मिळाली. 

खरंतर, भारतीय संघ इंग्लंडला जाण्यापूर्वी माजी क्रिकेटर्सचे म्हणणे होते की तेथे स्विंग आणि वेगाच्या समोर होणाऱ्या चुका टाळल्या पाहिजे. कोहलीने हीच चूक पुन्हा केली आणि आपली विकेट त्याने गमावली. जर कोहली लवकरच बाद झाला नसता तर सामन्याचे चित्र काहीच वेगळे होते. दरम्यान, बाकी काही असले तरी ग्रँडहोमने जो चेंडू टाकला होता तर खरंच चांगला होता. 

आयसीसीच्या वर्ल्डकपला जरी ३० जूनपासून सुरूवात होत असली तरी भारताच्या अभियानाला ५ जूनपासून सुरूवात होत आहे. भारताचा वर्ल्डकपमध्ये पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. तर १६ जूनला भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. 

यंदाचा वर्ल्डकप रॉबिन राऊंड फॉरमॅट पद्धतीने होणार आहे. यात एकूण १० संघांपैकी प्रत्येक संघाला इतर ९ संघांविरुद्ध सामना खेळणे गरजेचे आहे. त्यानंतर पॉईंट टेबलमध्ये ज्या संघांचे सर्वाधिक गुण होतील ते चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी