जाणून घ्या वेस्ट इंडिजच्या धडाकेबाज बॅट्समनच्या फिटनेसचं रहस्य

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 15, 2019 | 22:09 IST | टाइम्स नाऊ हिंदी

क्रिस गेल म्हटलं की आयपीएलमधील त्याची वादळी खेळी आपल्याला आठवते. धमाकेदार क्रिकेट खेळणाऱ्या क्रिस गेल आणि वेस्ट इंडिजच्या कॅप्टननं आपल्या फिटनेसचं गुपित फॅन्सना सांगितलंय. जाणून घ्या त्यांचा फिटनेस फॉर्म्यूला..

Chris Gayle and Russel
गेल आणि रसेलच्या फिटनेसचं रहस्य 

मुंबई: आपल्या क्रिकेट करिअरमधील पाचवा आणि अखेरचा वर्ल्डकप खेळणाऱ्या वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन आणि धमाकेदार बॅट्समन क्रिस गेलनं वयाच्या ३९ व्या वर्षी आपल्या फिट राहण्याचा फॉर्म्यूला सांगितला आहे. या फिटनेस फंड्यामुळे हे ‘यूनिवर्स बॉस’ दोन महिन्यांपासून जिमपासून दूर आहेत. गेलच्या फिटनेसचं रहस्य म्हणजे योग आहे. ‘योगा’सोबतच गेल मालिशच्या सिटिंग्जही घेतो. ज्यामुळं त्याचा थकवा दूर होतो. नैसर्गिकचं तो शक्तीशाली असल्यानं तो जिमला जात नाही आणि दोन मॅचच्या दरम्यान व्यवस्थित आराम करत असतो.

आयपीएलच्या बाराव्या सिझनमध्ये क्रिस गेलनं किंग्ज इलेव्हन पंजाब टीमकडून खेळतांना ४१ च्या सरासरीनं ४९० रन्सची दमदार खेळी खेळलीय. गेलनं पीटीआयशी बोलतांना सांगितलं, ‘हा खूप आनंददायी खेळ आहे. वर्ल्डकपपूर्वी चांगले रन्स होत आहेत. माझ्या जवळ खूप अनुभव  आहे आणि मी आपल्या बॅटिंगनं आनंदी आहे. आशा करतो की बॅटिंगमधील ही लय कायम राहिल.’

क्रिस गेल बोलतांना पुढे म्हणाला, ‘वयाचा तर खेळावर परिणाम होतंच असतो. पण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळातील मानसिक दृष्टीकोन आहे. आता शारिरीक बाजू इतकी महत्त्वाची राहिली नाही. मी मागील दोन महिन्यांपासून फिटनेसवर इतकं लक्ष दिलं नाहीय. मी आपला अनुभव आणि मानसिक स्थिरतेचा वापर करतो. मी काही काळापासून जिममध्ये गेलो नाही. मी खूप आराम करतोय आणि मालिश करवून घेतोय. वर्ल्डकपसाठी ताजंतवानं राहण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.’

वर्ल्डकपमध्ये गेल आपल्या सोनेरी करिअरला परीकथेतील अखेरापर्यंत घेऊन जावू इच्छितो. त्याची इच्छा आहे की, टीममधील तरुण खेळाडूंनी त्याच्यासाठी वर्ल्डकप जिंकावा. आतापर्यंत १०३ टेस्ट, २८९ वनडे आणि जगभरात टी-२० लीग खेळणाऱ्या क्रिस गेलजवळ आता सिद्ध करण्यासाठी असं काही उरलेलं नाहीय. आता तो आपल्या चाहत्यांसाठी खेळतोय. क्रिस गेल पुढे म्हणाला, ‘मी आपल्या चाहत्यांसाठी खेळतोय. काही वर्षांपूर्वीच मी रिटायर्ड होण्याचं ठरवलं होतं, मात्र नंतर चाहत्यांनी खेळत राहण्याची विनंती केली होती. त्यामुळं मी आतापर्यंत त्यांच्यासाठीच खेळतोय. आशा आहे की काही अधिक मॅचमध्ये मी चाहत्यांचं मनोरंजन करू शकेल आणि वर्ल्डकप जिंकू शकेल.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी