वर्ल्डकपआधी भारतीय संघाला सतावतेय ही चिंता

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 22, 2019 | 17:53 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

World cup 2019: कुलदीप यादवने यंदाच्या आयपीएलच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना ९ सामन्यांमधील ३३ ओव्हरमध्ये केवळ ४ विकेट मिळवल्या. या दरम्यान त्याचा इकॉनॉनी रेट ८.८६ होता.

kuldeep yadav
कुलदीप यादव  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: आगामी वर्ल्डकपमध्ये कुलदीप यादव आपल्या स्पिन आक्रमणाने प्रतिस्पर्ध्यांवर भारी पडेल असे वाटत होते मात्र आयपीएलमधील त्याची सध्याची कामगिरी विराट कोहली आणि संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. इंग्लंडमध्ये येत्या ३० मेपासून वर्ल्डकपचे बिगुल वाजेल. याचा अर्थ वर्ल्डकपसाठी आता केवळ काहीच दिवस शिल्लक आहेत. चायनामॅन सध्या आयसीसीच्या वनडे गोलंदाजीतील रँकिंगमध्ये सातव्या स्थानावर आहे. तो आपला सहकारी युझवेंद्र चहलच्या एक स्थान पुढे आहे. 

कुलदीप आणि चहलची जोडी ही कुलचा नावाने प्रसिद्ध आहे. या जोडीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि वर्ल्डकपमध्येही ते एकत्र खेळणार असल्याची आशा आहे. कुलदीप आणि चहल या दोघांची निवड १५ सदस्यीय संघात करण्यात आली आहे. यासोबतच स्पिनर रवींद्र जडेजालाबी संधी मिळाली आहे. कुलदीप यादवचा खराब फॉर्म सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

२४ वर्षीय क्रिकेटरने ४४ वनडे सामन्यांमध्ये २२च्या सरासरीने ८७ विकेट मिळवल्या आहेत. त्याने २०१७मध्ये आयपीएलमध्ये १२ विकेट मिळवल्या होत्या. तर गेल्या वर्षी त्याने १७ विकेट मिळवल्या होत्या. मात्र या हंगामात तो पूर्ण फ्लॉप कामगिरी करताना दिसत आहे. कुलदीपच्या खराब कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने  सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशचा स्पिनरने सध्याच्या आयपीएलमध्ये ९ सामन्यांत केवळ चार विकेट मिळवल्या आहेत. यात त्याचा इकॉनॉमी रेट ८.६६ इतका राहिला आहे. 

कोलकाताचा पराभव झाल्यानंतर दिनेश कार्तिकने कुलदीपबद्दल म्हटले, खराब फॉर्ममुळे चायनामनला बाहेर बसवण्यात आले आहे. आम्ही त्याला ब्रेक देतोय ज्यामुळे तो पुन्हा नव्या उत्साहाने मैदानावर परतेल. कुलदीप ज्या पद्धतीने बॉलिंग करू शकतो तशी कामगिरी त्याच्याकडून होत नाही आहे. त्यामुळेच त्याला ब्रेक देण्यात आला आहे. 

दरम्यान, कुलदीप पुन्हा आपल्या लयीमध्ये परतेल आणि आगामी वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करेल अशी टीम इंडियाला आशा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
वर्ल्डकपआधी भारतीय संघाला सतावतेय ही चिंता Description: World cup 2019: कुलदीप यादवने यंदाच्या आयपीएलच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना ९ सामन्यांमधील ३३ ओव्हरमध्ये केवळ ४ विकेट मिळवल्या. या दरम्यान त्याचा इकॉनॉनी रेट ८.८६ होता.
Loading...
Loading...
Loading...