पावसामुळे रद्द झालेल्या सामन्याचा श्रीलंकेला फायदा, एका स्थान वरच्या दिशेने झेप

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 11, 2019 | 19:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

 बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात यंदाच्या वर्ल्ड कपमधील १६ वा सामना पावसामुळे रद्द झाला आहे.  ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानात ही मॅच होणार होती. 

sri lanka vs bangladesh
श्रीलंका वि. बांग्लादेश सामन्यानंतर पॉइन्ट्स टेबल 

ब्रिस्टल :  बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात यंदाच्या वर्ल्ड कपमधील १६ वा सामना पावसामुळे रद्द झाला आहे.  ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानात ही मॅच होणार होती. या मॅचमध्ये बांगलादेशच्या टीमचं पारडं जड असल्याचं बोललं जात होत.  बांगलादेशच्या टीमने आपल्या पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. मात्र, त्यानंत बांगलादेशला न्यूझीलंड आणि इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता विजय मिळवण्यासाठी बांगलादेशची टीम मैदानात उतरणार होते. तर, श्रीलंकेच्या टीमची सुरूवातच पराभवाने झाली. त्यांना न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात पराभूत केले.  यानंतर श्रीलंकेने अफगाणिस्तान टीमचा पराभव केला. बांगलादेशच्या टीमची कमान मशरफी मोर्तझा याच्याकडे आहे तर श्रीलंकेच्या टीमचं नेतृत्व दिमुथ करुणारत्ने करत आहे. वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे रद्द होणारा हा तिसरा सामना आहे. 

यामुळे आता श्रीलंकेचे चार सामन्यात चार अंक झाले आहे. श्रीलंकेचे आतापर्यंत दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यापूर्वी पाकिस्तानसोबतचा सामना हा पावसामुळे रद्द झाला होता. आता बांगलादेश विरूद्ध हा सामना रद्द झाला आहे. तर दुसरीकडे बांग्लादेशने चार सामन्यात एक सामना जिंकला आहे, दोन सामने पराभूत झाले आहेत तर आजचा एक सामना अनिर्णीत झाला आहे. त्यामुळे त्याचे तीन अंक आहेत.

हा सामना रद्द झाल्याने श्रीलंकेला फायदा झाला आहे. श्रीलंका एका स्थानाने वरच्या दिशेने झेप घेतली आहे. श्रीलंकेचा आतापर्यंतचा स्टार गोलंदाज नुवान प्रदीप दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो हा सामना खेळणार नव्हता. तसेच श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगा याच्या सासूचे निधन झाल्याने तो मायदेशी रवाना होणार आहे. त्यामुळेही तो या संघात खेळणार नव्हता. अशा परिस्थितीत बांग्लादेशचे पारडे जड होते. पण अखेर पाऊस त्यांच्या मदतीला आल्याने एक अंकही मिळाला आणि जखमी प्रदीप आणि मलिंगा शिवाय मैदानात उतरण्याची वेळही नाही आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पावसामुळे रद्द झालेल्या सामन्याचा श्रीलंकेला फायदा, एका स्थान वरच्या दिशेने झेप Description:  बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात यंदाच्या वर्ल्ड कपमधील १६ वा सामना पावसामुळे रद्द झाला आहे.  ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानात ही मॅच होणार होती. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola