IND vs SA: द. आफ्रिकेत कोरोना केसेस वाढले तर काय? CSAने टीम इंडियाला दिली ही गॅरंटी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 23, 2021 | 12:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa: द. आफ्रिकेत ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. अशातच शक्यता आहे की भारताचा हा दौरा मध्येच रद्द केला जाऊ शकतो. अशातच भारतीय क्रिकेट मंडळाने द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून काही आश्वासने घेतली आहे. 

team india
आफ्रिकेत कोरोना केसेस वाढले तर काय? CSAने दिली ही गॅरंटी 
थोडं पण कामाचं
  • . द. आफ्रिकेत कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे केसेस आढळल्यानंतर ही मालिका धोक्यात आली होती.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(BCCI) आणि क्रिकेट दक्षिण अफ्रीका (CSA)ने आपापसातील सहमतीने ही मालिका पुढे नेण्याचा निर्णय घेतला.  
  • भारत या दौऱ्यात तीन कसोटी आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा द. आफ्रिका दौरा(india tour of south africa) २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनच्या मैदानावर रंगणार आहे. या मैदानावर पहिली कसोटी होत आहे. मात्र कोविड १९चा नवा व्हेरिएंटओमिक्रॉन (Omicron)च्या वाढत्या केसेस पाहता हा दौरा मध्येच रद्द केला जाऊ शकतो. द. आफ्रिकाने भारतीय क्रिकेटर्सना गॅरंटी दिली आहे की जर कोरोनामुळे देशाच्या सीमा बंद झाल्या तर त्यांना घरी पोहोचवले जाईल. द. आफ्रिकेत कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे केसेस आढळल्यानंतर ही मालिका धोक्यात आली होती. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(BCCI) आणि क्रिकेट दक्षिण अफ्रीका (CSA)ने आपापसातील सहमतीने ही मालिका पुढे नेण्याचा निर्णय घेतला.  if corona cases increase in south africa? CSA gives this guarantee

दरम्यान, दोन्ही देशांमधील मालिका सुरू होण्यास उशीर झाला आणि यासोबतच दोन्ही देशांमधील टी-२० मालिका स्थगित करण्यात आली. भारताच्या द. आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक बदलण्यात आले. १० दिवसांनी हा दौरा पुढे ढकलण्यात आला. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरपासून सुरू होणार होता. मात्र मालिकेची सुरूवात आता २६ डिसेंबरपासून होत आहे. 

क्रिकेट दक्षिणआफ्रिकेकडून बीसीसीआयला दिलेल्या हमींमध्ये भारतीय खेळाडूंना कोणत्याही कारणामुळे भर्ती होण्याची गरज भासल्यास रुग्णालयात बेडही उपलब्ध आहे. न्यूज २३ डॉट कॉमने सीएसएच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी शुएब मांजरा यांच्या हवाल्याने सांगितले, जर एखाद्या भारतीय खेळाडूला कोणत्याही कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासल्यास तर आम्ही काही रुग्णालयांच्या समूहांशी संपर्क साधला आहे. त्यांनी आम्हाला रुग्णालयात बेड उपलब्ध करून देऊ अशी हमी दिली आहे.

तसेच पुढे ते हे ही म्हणाले, की जर मायदेशी परतण्याची आवश्यकता असेल आणी सीमा बंद केल्या तर सरकारने आश्वासन दिले आहे ते खेळाडूंना आणि संघाला भारत जाण्याची परवानगी देतील. संपूर्ण दौरा बंद दरवाजामागे खेळवला जाईल. यात सामान्य जनतेला खेळाडूंशी संपर्क साधण्याची कोणतीही परवानगी नसेल. 

ते पुढे म्हणाले, मला वाटते की खेळाडूंची सुरक्षा आणि घरी पुन्हा जाण्याबाबतचे उपाय केले जाऊ शकतात. आम्ही सगेळे केले आहे. भारतीय संघ केवळ येथे सुरक्षितच नाही तर कोणत्याही कारणामुळे त्यांना माघारी जाण्याची गरज पडल्यास त्यांच्यासाठी मार्ग खुले आहेत. भारत या दौऱ्यात तीन कसोटी आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी