T20 World Cup 2022: भारत-पाकिस्तामध्ये फायनल झाल्यास कोणता संघ मारेल बाजी, झाली मोठी भविष्यवाणी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 27, 2022 | 11:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs PAK: टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमहर्षक सामना पाहायला मिळू शकतो. दोन्ही देशांच्या माजी क्रिकेटर्सनी याबाबत भविष्यवाणी केली आहे की भारत आणि पाकिस्तान टी20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये आमनेसामने येऊ शकतात. 

india vs pakistan
भारत-पाकिस्तामध्ये फायनल कोण मारेल बाजी, मोठी भविष्यवाणी 
थोडं पण कामाचं
  • रवी शास्त्रींनी सांगितले, टी20 वर्ल्ड कप 2022च्या फायनल सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगू शकतो. र
  • जर टी20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी झाल्यास रोहितच्या नेतृत्वातील टीम इंडिया बाजी मारू शकते.
  • भारताला सेमीफायनलमध्ये जागा बनवण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये नेदरलँड्स, झिम्बाब्वे आणि बांगलादेशला हरवावे लागेल

मुंबई: टी20 वर्ल्ड कप 2022(T20 world cup 2022,)मध्ये पुन्हा एकदा भारत(india)आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यात रोमहर्षक सामना पाहायला मिळू शकतो. दोन्ही देशांच्या माजी क्रिकेटर्सनी याबाबत भविष्यवाणी केली आहे की भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ टी20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये समोरा-समोर येऊ शकतात. यात आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री(ravi shastri)यांचे नावही जोडले गेले आहे. रवी शास्त्रींनी भारत-पाकिस्तान यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये खिताब जिंकण्यासाठीचा सामना रंगू शकतो याबाबत भविष्यवाणी केली आहे. If india pakistan final happen who will win the match,  big reveal

अधिक वाचा - लॅपटॉपवर काम करून थकतात हात आणि बोटं

भारत-पाकिस्तान यांच्यातील फायनलबाबत भविष्यवाणी

रवी शास्त्रींनी सांगितले, टी20 वर्ल्ड कप 2022च्या फायनल सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगू शकतो. रवी शास्त्रींनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले, जर टी20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी झाल्यास रोहितच्या नेतृत्वातील टीम इंडिया बाजी मारू शकते. 

रवी शास्त्रींनी सांगितले, आम्ही पाकिस्तानविरुद्ध 1985मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमधी पहिला सामना मेलबर्नममध्ये खेळलो होतो. त्या सामन्यात आम्ही जिंकलो होते. जर भारत आणि पाकिस्तान टी20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये समोरासमोर येतील तर आम्ही त्यांना मात देऊ. 

अधिक वाचा - ब्रेक फेल झाला आणि मालगाडीचे 53 डबे रुळावरून घसरले

सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियासाठी हे रस्ते

भारताला सेमीफायनलमध्ये जागा बनवण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये नेदरलँड्स, झिम्बाब्वे आणि बांगलादेशला हरवावे लागेल. जर टीम इंडिया द. आफ्रिकेविरुद्ध एक सामना हरत असेल तर त्याचा खास परिणाम होणार नाही. दरम्यान, ज्या फॉर्मात टीम इंडिया आहे ते पाहता द. आफ्रिकेलाही कठीण समस्येचा सामना करावा लागू शकतो. 

पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त विजय

भारताने टी20 वर्ल्डकप 2022मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवला. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगला होता. शेवटच्या बॉलमध्ये एका धावेची गरज असताना अश्विनने शॉट मारत एक धाव घेतली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी