इंग्लंडविरुद्ध विश्वचषक फायनल खेळायची आहे भारताला, पाहा कोच शास्त्री काय म्हणाले!

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 10, 2019 | 18:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारत जर विश्वचषक फायनल इंग्लंडसोबत खेळला तर तेव्हा विजय नक्की भारताचाच असेल. असं भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वाटतं.

ravi_shastri_twitter
इंग्लंडविरुद्ध विश्वचषक फायनल खेळायची आहे भारताला, पाहा कोच शास्त्री काय म्हणाले!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • इंग्लंडविरुद्ध भारत अंतिम सामना जिंकेल असं वाटतं रवी शास्त्रींना 
  • रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधील मोठा खेळाडू: रवी शास्त्री 
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्धची रोहित खेळी सर्वोत्कृष्ट असल्याचं वाटतं रवी शास्त्रींना

मेन्चेस्टर: विश्वचषकातील लीग सामन्यामध्ये भारताचा यजमान टीमसोबत झालेल्या पराभवानंतर देव इंग्लंडसोबत होता असं भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वाटतं. पण यासोबतच शास्त्री यांनी अशी आशा व्यक्त केली आहे की, जर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला तर देव आमच्यासोबत असेल. भारताने जर सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत केलं तर फायनलमध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड यांच्यापैकी एकाशी भिडावं लागणार आहे. भारताने विश्वचषकात लीग राऊंडमध्ये नऊपैकी सात सामने जिंकून सेमीफायनलमध्ये आपली जागा बनवली होती. इंग्लंड ही एकमेव अशी टीम आहे की, जिने लीग राऊंडमध्ये भारताला पराभूत केलं होतं. 

विश्वचषक स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या इंग्लंडने करो या मरो सामन्यात भारताला पराभूत करुन सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा आशा जिवंत ठेवल्या होत्या. आयसीसीद्वारे पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शास्त्री असं म्हणाले होते की, 'मला असं वाटतं की, त्या दिवशी देव इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये होता. मी आशा करतो की, जर आम्ही पुढील सामना इंग्लंडसोबत खेळू शकलो तर तेव्हा देव आमच्या ड्रेसिंग रुममध्ये असेल.' यावेळी शास्त्री यांनी टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रोहित शर्माचं खूपच कौतुक केलं. रोहित शर्माने या विश्वचषकात पाच शतकं झळकावली आहेत. 

यावेळी शास्त्री असं म्हणाला की, 'रोहित हा वनडे क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. या विश्वचषकात त्याने चांगल्या धावा केल्या आहेत. त्याचा मागील कामगिरीवर देखील आपण नजर टाका. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं त्याच्या नावावर आहेत. कुणीही अशी कामगिरी करु शकलेलं नाही. सलामीला फलंदाजी करताना रोहितनं नेहमी चांगली कामगिरी केली आहे. त्याचा फॉर्म कसा आहे ही महत्त्वाची गोष्ट नाही. त्याचा सध्या फॉर्म हा तुफान आहे. त्यामुळे विश्वचषकात त्याचा फॉर्म असणं हे कोच म्हणून माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.' 

रोहितच्या फॉर्मचा भारताला फायदा झाला आहे. त्याने सेमीफायनलच्या आधी तीन शतकं ठोकले आहेत. द. आफ्रिकेविरुद्ध रोहितने चांगलं शतक ठोकलं होतं. याचबाबत बोलताना शास्त्री म्हणाले की, 'ती खेळपट्टी टणक होती. तिथे चेंडू एकसारख्या गतीने येत नव्हता. यासाठीच मला असं वाटतं की, रोहित शर्माची ती खेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात चांगली खेली होती.'

दरम्यान, भारताला न्यूझीलंडविरुद्धचा सेमीफायनल जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचू शकतो. त्यामुळे या सामन्यात भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
इंग्लंडविरुद्ध विश्वचषक फायनल खेळायची आहे भारताला, पाहा कोच शास्त्री काय म्हणाले! Description: भारत जर विश्वचषक फायनल इंग्लंडसोबत खेळला तर तेव्हा विजय नक्की भारताचाच असेल. असं भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वाटतं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola