India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत करणार क्लीन स्वीप! धवनला करावे लागेल हे काम

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 26, 2022 | 15:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs West Indies: भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा वनडे सामना २७ जुलैला खेळत आहे. या सामन्यात कर्णधार शिखर धवन क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. मात्र यासाठी त्याला संघात काही बदल करावे लागतील. 

shikhar dhawan
विंडीजविरुद्ध क्लीन स्वीपसाठी धवनला करावे लागेल हे काम 
थोडं पण कामाचं
  • २७ जुलैला खेळवला जाणार पहिला सामना
  • धवनला करावे लागेल हे काम
  • क्लीन स्वीपवर असणार भारतीय संघाचा नजरा

मुंबई: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध(india vs west indies) शानदार पद्धतीने मालिका जिंकली आहे. टीम इंडियााठी गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही चांगली कामगिरी केली. टीम इंडिया(team india) या मालिकेत आधीच २-०ने आघाडीवर आहे. आता धवन सेनेच्या नजरा वेस्ट इंडिजविरुद्ध क्लीन स्वीप करण्यावर असणार आहे. यासाठी कर्णधार धवन(captain shikhar dhawan) कोणतीही कसर सोडणार नाही. मालिकेत क्लीन स्वीप(clean sweap) करण्यासाठी कर्णधार धवनला केवळ एका काम करावे लागेल. If shikhar dhawan want clean sweap against west indies then he has to do this

अधिक वाचा - जालियनवाला बागेतील विहीरीत नाही दिसणार पैसा, जाणून घ्या का?

संघाची कमजोरी आहेत हे प्लेयर्स

सामना जिंकण्यासाठी कोणत्याही संघाची मधली फळी मजबूत असणे गरजेचे असते. अशातच टीम इंडियाची मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव फ्लॉप ठरत आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाही आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यात त्याने १३ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने ९ धावा केल्या होत्या. तो खूपच खराब फॉर्मात आहे. अशातच कर्णधार धवन त्याला प्लेईंग ११मधून बाहेर करत किशनला संधी देऊ शकतो. 

मजबूत करणार गोलंदाजी आक्रमण

वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी खेळले नाहीत. अशातच अनेक युवा तरूणांना जागा मिळाली. मात्र ते चांगली कामगिरी करू शकत नाहीयेत. आवेश खानने दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघासाठी पदार्पण केले. मात्र तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने ६ ओव्हरमध्ये ५४ धावा दिल्या आणि एकही विकेट मिळवू शकला नाही. त्यामुळे जर वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप द्यायचा असेल तर आवे खानच्या जागी अर्शदीप सिंहला संधी द्यावी लागेल. 

अधिक वाचा - मोठी बातमी ! राजकीय भूकंप होणार; भाजपचे १६ आमदार फुटणार

गेल्या १६ वर्षात नाही हरली मालिका

भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या धरतीवर गेल्या १६ वर्षात एकही वनडे मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग १२ वनडे मालिका जिंकत नवा इतिहास रचला आहे. या बाबतीीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहेत. टीम इंडियाकडे अनेक मॅच विनिंग प्लेयर्स आहेत. गेल्या दोन दशकात भारतीय क्रिकेट संघ क्रिकेटमध्ये खूप पुढे गेला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी