सेंच्युरी झळकावल्यानंतर पाकिस्तानच्या इमामच्या नावावर झाला 'हा' लाजीरवाणा रेकॉर्ड

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 05, 2019 | 22:06 IST | टाइम्स नाऊ हिंदी

PAK vs BAN: पाकिस्तानचा ओपनर बॅट्समन इमाम उल हक याने यंदाच्या वर्ल्ड कपमधील आपली पहिली सेंच्युरी केली. मात्र, त्यानंतर असं काही झालं ज्यामुळे इमाम उल हक याच्यानावावर एक लाजीरवाणा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

Imam ul haq
इमाम उल हक  |  फोटो सौजन्य: Twitter

लंडन: बांगलादेश विरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानची टीम एक चमत्कार करत विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र, कुठलाही चमत्कार करणं त्यांना शक्य झालं नाही. पाकिस्तानने प्रथम बॅटिंग करत 315 रन्स केले. पाकिस्तानचा ओपनर बॅट्समन इमाम उल हक आणि युवा बॅट्समन बाबर आझम या दोघांनी बॅटिंगची सुरूवात केली. इमाम याने चांगली बॅटिंग करत सेंच्युरी सुद्धा केली मात्र, त्यानंतर त्याच्या नावावर एक लाजीरवाणा रेकॉर्डची नोंदही झाली आहे.

बाबर आझम 96 रन्सवर आऊट झाला आणि सेंच्युरी करण्यात त्याला अपयश आलं. मात्र, इमाम उल हक याने यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिली सेंच्युरी झळकावली. सेंच्युरी झळकावल्यानंतर इमाम आऊट झाला मात्र तो ज्या पद्धतीने आऊट झाला ते खूपच निराशाजनक होतं. इमामने सेंच्युरी झळकावल्यानंतर तो हिट विकेट आऊट झाला. अशा प्रकारे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हिट-विकेट होणारा तो दुसरा बॅट्समन बनला आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल हा सुद्धा हिट विकेट झाला आहे. इमाम याने 100 बॉल्समध्ये 100 रन्स करुन आऊट झाला. इमाम याला कुणीही आऊट केलं नाही तर तो स्वत:च हिट विकेट झाला.

पाकिस्तानच्या इनिंगमधील 42वी ओव्हर बांगलादेशचा मुस्तफीझूर रेहमान टाकत होता आणि त्याच्या समोर बॅटिंग करत होता इमाम. सेंच्युरी झळकावल्यानंतर इमाम आणखीन आक्रमक बॅटिंग करेल असं सर्वांनाच वाटलं होतं. मात्र, मुस्तफीझूर याच्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर इमामचा पाय स्टम्पला लागला आणि तो हिट विकेट झाला. 

हिट विकेट आऊट होणं हे प्रत्येक बॅट्समनसाठी लाजीरवाणं असतं आणि हे इमामच्या चेहऱ्यावरही दिसत होतं. आता इमाम अशा क्रिकेटर्सच्या यादीत पोहोचला आहे ज्ये सेंच्युरी झळकावल्यानंतर हिट विकेट झाले आहेत. जाणून घेऊयात वन-डे क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकावून अशा प्रकारे कुठले बॅट्समन आऊट झाले आहेत. 

  1. 126 रन्स - फाफ डु प्लेसिस, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (हरारे, 2014)
  2. 107 रन्स - विराट कोहली, भारत विरुद्ध इंग्लंड (कार्डिफ, 2011) 
  3. 104 रन्स - जॉनी बेअरस्ट्रो, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (क्राइस्टचर्च, 2018)
  4. 100 रन्स - इमाम-उल-हक, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (लॉर्ड्स, 2019)

बांगलादेशची टीम सात रन्सवर ऑल आऊट झाली असती तर पाकिस्तानच्या वर्ल्ड कपमधील अपेक्षा कायम राहिल्या असत्या. मात्र, तसं झालं नाही आणि पाकिस्तानची टीम वर्ल्ड कपमधून बाहेर झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सेंच्युरी झळकावल्यानंतर पाकिस्तानच्या इमामच्या नावावर झाला 'हा' लाजीरवाणा रेकॉर्ड Description: PAK vs BAN: पाकिस्तानचा ओपनर बॅट्समन इमाम उल हक याने यंदाच्या वर्ल्ड कपमधील आपली पहिली सेंच्युरी केली. मात्र, त्यानंतर असं काही झालं ज्यामुळे इमाम उल हक याच्यानावावर एक लाजीरवाणा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.
Loading...
Loading...
Loading...