भेदभाव संपला, महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार : BCCI

implementing pay equity policy for women cricketer says BCCI : भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शहा यांनी मोठी घोषणा केली. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना मानधन देताना केला जाणारा भेदभाव संपवत असल्याचे जय शहा यांनी क्रिकेट बोर्डाच्यावतीने जाहीर केले.

implementing pay equity policy for women cricketer says BCCI
भेदभाव संपला, महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार : BCCI  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भेदभाव संपला, महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार : BCCI
  • भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शहा यांनी केली घोषणा
  • ट्वीट करून दिली निर्णयाची माहिती

implementing pay equity policy for women cricketer says BCCI : भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शहा यांनी मोठी घोषणा केली. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना मानधन देताना केला जाणारा भेदभाव संपवत असल्याचे जय शहा यांनी क्रिकेट बोर्डाच्यावतीने जाहीर केले. आता महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाच्यावतीने सचिव जय शहा म्हणाले.

कसोटी सामन्यासाठी महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंचे मानधन समान म्हणजेच 15 लाख रुपये असेल. एकदिवसीय सामन्यासाठी महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंचे मानधन समान म्हणजेच 6 लाख रुपये असेल. टी 20 सामन्यासाठी महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंचे मानधन समान म्हणजेच 3 लाख रुपये असेल.

T20 World Cup 2022: टी-20 वर्ल्ड कप टुर्नामेंटवर कोरोनाचं सावट, 'हा' दिग्गज प्लेअर कोविड पॉझिटिव्ह

VIDEO: कोहलीने सांगितला शेवटच्या बॉलचा 'तो' किस्सा

जय शहा यांनी ट्वीट करून भेदभाव संपवून समान मानधन व्यवस्था लागू करत असल्याचे जाहीर केले. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी ही मोठी घोषणा म्हणता येईल. कारण भारतात क्रीडा क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करणाऱ्यांची संख्या मर्यादीत आहे. तसेच देशात व्यावसायिक पद्धतीने क्रीडा व्यवस्थापन करणाऱ्यांची आणि क्रीडाविषयक मार्गदर्शन करणाऱ्यांची संख्याही मर्यादीत आहे. देशात अनेक वर्षांपासून खेळांमध्ये मानधन देताना महिला आणि पुरुष असा भेद केला जातो. काही खेळांमध्ये अद्याप महिला संघांना पुरुषांच्या तुलनेत सोयी सुविधा पण मिळत नाहीत. याच कारणामुळे बीसीसीआयने केलेली घोषणा ही भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी