Ind vs Pak: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान टीम काळी पट्टी बांधून उतरणार मैदानात

Ind vs Pak Match: दुबईत रविवारी खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध आशिया चषक सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू हे आपल्या दंडावर काळी पट्टी बांधून खेळणार आहे. जाणून घ्या काय आहे यामागचं नेमकं कारण?

in match against india pakistani team will land with a black band on field
भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पाक खेळाडू बांधणार काळी पट्टी (फाइल फोटो) 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे भयंकर पूर परिस्थिती
  • सुमारे 10 लाख पाकिस्तानी नागरिकांना पुराचा फटका
  • पाकिस्तानी संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार, पुरामुळे बाधित लोकांना करणार मदत

Ind vs Pak Match Live: दुबई: आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारत (India)आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यावेळी दोन्ही देशांच्या क्रिकेट (Cricket) चाहत्यांसह संपूर्ण जग या सामन्याची वाट पाहत आहे. 9 महिन्यांपूर्वी दुबईत 2021 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान दोन्ही संघ आमनेसामने आले होते. अशा स्थितीत पुन्हा एकदा आता भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी हे एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. अशा स्थितीत नव्या कर्णधारासह टीम इंडिया मागील पराभवाचा हिशेब चुकता करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पण याच महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानी टीममधील खेळाडू हे काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहेत. (in match against india pakistani team will land with a black band on field)

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काळी पट्टी 

भारताविरुद्धच्या सामन्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाकिस्तान क्रिकेट संघाने या संधीचा उपयोग पाकिस्तानात आलेल्या भयंक पुरामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पाकिस्तानी संघाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा: Virat Kohli : भारत पाकिस्तान मॅचआधी विराट कोहलीचा धक्कादायक गौप्यस्फोट

दहा लाख पाकिस्तानी लोकांना पुराचा फटका

पाकिस्तानात पुराने अक्षरश: कहर केला आहे. पाकिस्तानात सुमारे दहा लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. पाकिस्तान आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात तब्बल 119 पाकिस्तानी नागरिकांना पुरात आपला जीव गमवावा लागला आहे. 

सिंध प्रांतात सर्वाधिक 76 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी बलुचिस्तानमध्ये 4, गिलगिट बाल्टिस्तानमध्ये 6 आणि खैबर पख्तूनख्वामध्ये 31 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला.

अधिक वाचा: IND vs Pak T20 Live Cricket Streaming: आशिया कप २०२२, भारत वि. पाकिस्तान टी २० मॅच कुठे आणि कशी बघाल LIVE

भारताचा 15 जणांचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई, आवेश खान, दीपक हुडा, युजवेंद्र चहल

पाकिस्तानचा 15 जणांचा संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमन, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, आसिफ अली, मोहम्मद हसनैन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी