Video: मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजाने रचला इतिहास; फक्त १० चेंडूत ठोकल्या ५२ धावा

Tim David Video | आयपीएलचा १५ वा हंगाम नुकताच संपला आहे. मात्र आयपीएलमध्ये झळकलेले नवे चेहरे आजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळणाऱ्या फलंदाजाने ताबडतोब फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे

In the ongoing T20 Blast in England, Team David scored 52 off just 10 balls
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने फक्त १० चेंडूत ठोकल्या ५२ धावा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजाने रचला इतिहास.
  • टिम डेव्हिडची आक्रमक खेळी.
  • डेव्हिडने फलंदाजाने फक्त १० चेंडूत ठोकल्या ५२ धावा.

Tim David Video | नवी दिल्ली : आयपीएलचा १५ वा हंगाम नुकताच संपला आहे. मात्र आयपीएलमध्ये झळकलेले नवे चेहरे आजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळणाऱ्या फलंदाजाने ताबडतोब फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-२० ब्लास्ट स्पर्धेत या फलंदाजाने १० चेंडूत ५२ धावा केल्या. लक्षणीय बाब म्हणजे या ५२ धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. यावरूनच त्याच्या आक्रमक खेळीचा अंदाज लावला जाऊ शकतो. (In the ongoing T20 Blast in England, Team David scored 52 off just 10 balls). 

अधिक वाचा : या ४ गोष्टी खाल्ल्याने शुक्राणूंच्या संख्येत होते वाढ

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा जलवा

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये जलवा दाखवणारा सिंगापुरचा क्रिकेटर टिम डेव्हिड (Tim David) याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-२० ब्लास्ट  (Vitality Blast 2022) या स्पर्धेत लॅंकेशायरकडून खेळताना त्याने यॉर्कशायरविरुद्धच्या सामन्यात ३२ चेंडूत ६६ धावा केल्या होत्या.

 १० चेंडूत ठोकल्या ५२ धावा

सिंगापूरचा क्रिकेटपटू टीम डेव्हिडने यॉर्कशायरच्या गोलंदाजांची फजिती करताना ४ चौकार आणि ६ षटकार मारले. म्हणजेच फक्त १० चेंडूत टीम डेव्हिडने केवळ चौकार आणि षटकारांच्या जोरावर ५२ धावा केल्या आहेत. टीम डेव्हिडची अशी आक्रमक फलंदाजी पाहून सगळेच त्याचे चाहते झाले आहेत.

सामनावीर म्हणून घोषित 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लॅंकेशायर संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात यॉर्कशायरचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून २०९ धावाच करू शकला आणि सामना ४ धावांनी गमावला. टीम डेव्हिडला त्याच्या आक्रमक खेळीमुळे सामनावीर म्हणून घोषित केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी