IND v ENG: इंग्लंडचा कर्णधार रूट सिराजच्या घातक चेंडूवर झाला नमस्तक, पहा  विकेटचा व्हिडिओ

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे कसोटी मालिकेचा चौथा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे.

ind v eng how did english captain root bow down on sirajs fatal ball see video
IND v ENG: जो रूट सिराजच्या घातक चेंडूवर झाला असा बाद 

थोडं पण कामाचं

  • भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे कसोटी मालिकेचा चौथा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे.
  • ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे.
  • आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला हा सामने जिंकणे किंवा ड्रॉ करावे लागणार आहे.

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे कसोटी मालिकेचा चौथा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाने 30 धावांत 3 महत्त्वपूर्ण बळी गमावले. इंग्लंडचा तिसरी विकेट कर्णधार जो रुटच्या रूपात पडली. त्याला भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने शानदार इनसिंग बॉलवर एलबीडब्ल्यू केले. रूट 5 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर माघारी परतला.


४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला हा सामने जिंकणे किंवा ड्रॉ करावे लागणार आहे. जर हा सामना भारत हरला तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी