IND vs AUS 1st ODI: पहिल्या वनडेत पाऊस करणार बॅटिंग? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

 भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (India and Australia)पहिला एकदिवशीय सामना (ODI match) शुक्रवारी होणार आहे. मुबंईतील वानखेडे  स्टेडियमवर (Wankhede Stadium) हा सामना होणार आहे. परंतु या सामन्यात वरुणराजा (Rain) बॅटिंग करणार असल्याचा अंदाज आहे.

IND vs AUS 1st ODI: Batting will rain in the first ODI? Know the weather forecast
भारत-ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वनडेत पाऊस ठरेल व्हिलन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शुक्रवारी मुंबई आणि इतर शहरांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • मैदानावरील खेळाडूंना उन्हाचा तडाखा बसू शकतो.
  • दिवसाचे कमाल तापमान 31 अंश तर किमान तापमान 24 अंश राहण्याचा अंदाज

मुंबई :  भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (India and Australia)पहिला एकदिवशीय सामना (ODI match) शुक्रवारी होणार आहे. मुबंईतील वानखेडे  स्टेडियमवर (Wankhede Stadium) हा सामना होणार आहे. परंतु या सामन्यात वरुणराजा (Rain) बॅटिंग करणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईत (Mumbai)बुधवारी आणि गुरुवारी हलका पाऊस पडला आहे. पण शुक्रवारीही पाऊस होणार असल्याची शक्यता आहे.  (IND vs AUS 1st ODI: Batting will rain in the first ODI? Know the weather forecast)

अधिक वाचा  :  प्रसूतीनंतर होणारी केस गळती कसं थांबवणार​

 राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. हवामानाच्या या बदलामुळे मुंबईतील सामन्यावर पावसाचे ढग आले आहेत.  शुक्रवारी मुंबई आणि इतर शहरांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून वनडे लढत सुरू होणार असल्याने सामन्यावर याचा काही परिणाम होणार का, यावर सर्वांचे लक्ष आहे. 
 अधिक वाचा  :  तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे फळांचा राजा

ॲक्यूवेदरच्या (AccuWeather) अहवालानुसार मुंबईत शुक्रवारी जोरदार पाऊस तर नक्कीच पडणार नाही. पण पावसाच्या हलक्या सरी सकाळी येऊ शकतात. पण शुक्रवारी दिर्घकाळ मात्र पाऊस पडणार नाही. पण मुंबई उष्णता मात्र जास्त असेल आणि त्याचा परिणाम खेळाडूंवर होऊ शकतो. मैदानावरील खेळाडूंना उन्हाचा तडाखा बसू शकतो. दिवसाचे कमाल तापमान 31 अंश तर किमान तापमान 24 अंश राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय आकाश जवळपास निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस या सामन्यात व्हिलन ठरणार नाही अशी आशा आहे. 

अधिक वाचा  : मासिक पाळीच्या दरम्यान खाऊ नका ही फळं​

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जवळपास तीन वर्षांनी वनडे मालिका होणार आहे. यापूर्वी 2020 साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वनडे मालिका खेळवण्यात आली होती. त्यावेळी विराट कोहली हा भारताचा कर्णधार होता. पण आता पहिल्या वनडेमध्ये मात्र हार्दिक पंड्या हा भारताचा कर्णधार असेल. पण उर्वरीत दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात मात्र भारताचे नेतृत्व हे रोहित शर्माच्या हातामध्ये असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी