IND Vs AUS 1st Test Day 3 नागपूर: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील (Border-Gavaskar Trophy 2023)पहिला सामना नागपुरात (Nagpur) खेळवला जात आहे. पहिल्या कसोटीच्या आज तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 132 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या फिरकीमध्ये कांगारूचा संघ अडकला. अश्विनने 37 धावा देत ऑस्ट्रेलियाचे पाच खेळाडूंना तंबूत परत पाठवलं . (IND Vs AUS 1st Test Day 3: India's win over the Australia; Australia team caught in Ashwin's spin)
सामन्यात सुरुवातीपासून भारताने आपले वर्चस्व ठेवले होते.ज्यात ऑस्ट्रेलियाला 177 धावांत सर्वबाद करुन भारताने पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपत सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला. भारताकडून रवींद्र जाडेजाने दोन्ही डावात मिळून 7 तर अश्विननं दोन्ही डावांत मिळून 8 विकेट्स घेतल्या.
अधिक वाचा : रुपाली भोसलेचं 'रेड हॉट' रुप पाहून चाहते घायाळ
याशिवाय कॅप्टन रोहित शर्माने 120 तर अक्षर पटेल 84 आणि रवींद्र जाडेजा 70 यांनी सर्वाधिक धावा केल्या. मोहम्मद शमीनेही 37 धावांची खेळी खेळली होती.ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फीने 7 विकेट घेतल्या. पॅट कमिन्सला दोन आणि नॅथन लायनला एक विकेट मिळाली.
अधिक वाचा : दिग्दर्शकाच्या पत्नीने उर्मिला मातोंडकरला दिले होते फटके; पण का...
दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 400 धावा केल्या. यामुळे भारताकडे पहिल्या डावात 223 धावांची आघाडी मिळाली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारूंचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर टिकला नाही.
अश्विनच्या आक्रमक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव फक्त 91 धावांवर संपुष्ठात आला. मार्नस लबुशेन 17, डेव्हिड वॉर्नर-एलेक्स कॅरी शनिवारी 10-10 धावा करून बाद झाले. उर्वरित फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने 5 बळी घेतले. जडेजाने दोन गडी बाद केले. अक्षर पटेल आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक विकेट मिळाली. टॉड मर्फी (2 धावा) अक्षर पटेलकडे रोहितच्या हाती झेलबाद झाला. तत्पूर्वी रवींद्र जडेजाने पॅट कमिन्स (1 धाव) आणि मार्नस लबुशेन (17 धावा) यांना बाद केले.
रविचंद्रन अश्विनने 31व्यांदा कसोटीत 5बळी घेतले. त्याने एलेक्स कॅरी (10 धावा), पीटर हँड्सकॉम्ब (6 धावा), मॅट रॅनशॉ (2 धावा), डेव्हिड वॉर्नर (10 धावा) आणि उस्मान ख्वाजा (5 धावा) यांना बाद केले.