Ravindra Jadeja breaching Level 1 of the ICC Code of Conduct during Nagpur test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूर येथे पहिली टेस्ट मॅच झाली. या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. मात्र, याच मॅचमध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा याच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत रवींद्र जडेजावर कारवाई करण्यात आली आहे. जाणून घ्या नेमकं
नागपूर येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली टेस्ट मॅच झाली. या मॅचमध्ये रवींद्र जडेजा याने आपला जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. पहिल्या इनिंगमध्ये रवींद्र जडेजाने तब्बल 5 विकेट्स घेतल्या. मात्र, त्याच दरम्यान ऑस्ट्रेलियन मीडियाने रवींद्र जडेजावर गंभीर आरोप केला. रवींद्र जडेजाने मोहम्मद सिराजच्या मदतीने बॉल टॅम्परिंग केले, असा आरोप ऑस्ट्रेलियन मीडियाने केला. ऑस्ट्रेलियन मीडिया मॅच दरम्यानच्या एका घटनेचा संदर्भ देत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्रॉडकास्ट करण्यात आला.
One demerit point added to Jadeja’s disciplinary record. Incident occurred during 46th over of Australia’s first innings on Feb 9, when Jadeja was seen applying a soothing cream to his index finger: ICC — ANI (@ANI) February 11, 2023
हे पण वाचा : स्वप्नदोषाच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे ट्राय करा
16व्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजा बॉलिंगसाठी सज्ज होत असताना मोहम्मद सिराज जडेजाच्या जवळ आला. सिराजच्या हातात काही तरी चकाकत होते. ती चकाकणारी गोष्ट जडेजाने स्वतःच्या हाताच्या बोटांना लावली. नंतर त्याच बोटांनी जडेजाने बॉलला स्पर्श केला. याच संदर्भातील व्हिडिओ दाखवत ऑस्ट्रेलियन मीडियाने बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता.
हे पण वाचा : हे संकेत मिळताच समजून जा तुमचा वाईट काळ सुरू होणार
या प्रकरणात आयसीसीच्या आचार संहितेच्या अनुच्छेद 2.20 चं रवींद्र जडेजाने उल्लंघन केल्याचे आढळले. त्यानंतर आयसीसीने रवींद्र जडेजावर कारवाई केली. आयसीसीने लेवल 1 चे उल्लंघन केल्याचं सांगत रवींद्र जडेजाच्या मॅच फी मधील 25 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावला आहे.