IND vs AUS 2nd Test: लग्नानंतर टीम इंडियात परतलेला स्टार अष्टपैलू अक्षर पटेल बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) धमाकेदार फलंदाजी करत आहे. आघाडीचे फलंदाज (batsman)बाद झाल्यानंतर मोक्याच्या क्षणी अक्षर पटेल (Axar Patel)आणि आर अश्विन यांनी शतकी भागिदारी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. मोक्यांच्या क्षणी अक्षर पटेलची धमाकेदार खेळामुळे भारतीय संघाला (Indian team) संकटातून बाहेर काढलं. भारतीय संघासाठी अक्षरने संकटमोचकाची भूमिका निभावली आहे. अक्षर पटेल यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. तर आर अश्विन याने त्याला चांगली साथ दिली. अक्षर पटेल आणि आर. अश्विन (R. Ashwin) यांनी मोक्याच्या क्षणी 114 धावांची भागिदारी करत भारताचा डाव सावरला. (IND vs AUS 2nd Test : Akshar Patel half-century; Australia a lead of just one run )
अधिक वाचा : Daily Horoscope 19 February 2023: मिथुन, मीनसह या 6 राशींना होणार आर्थिक लाभ
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल भारताची सुरुवात चांगली झाली होती. पण त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट पडल्यामुळे डाव अडचणीत सापडला होता. 139 धावात 7 विकेट भारताने गमावल्या होत्या. त्यानंतर अश्विन आणि अक्षर यांनी शतकी भागिदारी केली आणि भारतीय संघाला पराभवाच्या संकटातून काढलं.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा रोहित शर्मा आणि राहुल यांनी संयमी सुरुवात केली. जोडी जमली असे वाटत असतानाच लॉयन याने राहुल याला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर पुजारालाही लॉयन याने तंबूत परत पाठवले. त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर लागोपाठ बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव कोसळला असे वाटत होते. पण त्यावेळीच विराट कोहलीनं जाडेजाच्या साथीनं डाव सावरला.
अधिक वाचा : या आहेत जगातील टॉप-9 महिला क्रिकेटपटू
जाडेजा आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी भागिदारी झाली. पण त्याचवेळी जाडेजा 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीही 44 धावांवर बाद झाला. कोहलीची विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या केएस भरतलाही फारसी कमाल करता आली नाही. त्यावेळी अक्षर पटेल आणि आर.अश्विन यांनी संकतटमोचकाची भूमिका निभावली. 117 चेंडूत 114 धावांची भागिदारी करत त्यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. अश्विन बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोसळला.. अक्षर आणि शमीही लगेच तंबूत परतले. भारताचा पहिला डाव 262 धावांवर संपुष्टात आला. परंतु ऑस्ट्रेलियाकडे फक्त एका धावेची आघाडी आहे.
अक्षर पटेल यानं मोक्याच्या क्षणी 74 धावांची खेळी केली. भारताकडून हे एकमेव अर्धशतक होय. विराट कोहलीनं 44, अश्विन याने 37, जाडेजानं 26 आणि कर्णधार रोहित शर्माने 32 धावांची खेळी केली.
अधिक वाचा : shivaji jayanti 2023: या मुद्द्यांनी समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांची महानता
मालिकेत सर्वाधिक धावा
रोहित शर्मा, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नल लबुशेन यांसारख्या खेळाडूंना मागे टाकत अक्षर पटेलने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सलग दुसरं अर्धशतक करत सर्वाधिक धावा केल्या आहेत. अक्षरने 2 सामन्यांच्या 2 डावात 79 च्या सरासरीने 158 धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ रोहित शर्मा 152 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या 56 धावा, स्टीव्ह स्मिथच्या 62 आणि मार्नस लॅबुशेनच्या 100* धावा आहेत.
नागपूर कसोटीत भारतीय संघाने 7 गडी गमावत 240 धावा केल्या होत्या. त्यावेळी फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने 84 धावा केल्या होत्या. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने 400 धावा केल्या होत्या. कसोटी कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावण्यापासून तो हुकला पण त्यांच्या शानदार खेळीने अनेकांनी त्याचे कौतुक केले.