IND vs AUS 2nd Test: भारताने 6 गडी राखत जिंकली दिल्ली टेस्ट, अश्विन-जडेजाच्या फिरकीची जादू

Delhi Test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023(Border-Gavaskar Trophy 2023) च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत टीम इंडियाने (Team India) सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून आता 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs AUS 2nd Test: India won the Delhi Test by 6 wickets
IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय  |  फोटो सौजन्य: Twitter

IND vs AUS: दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामन्यात देखील भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखली. भारताने दिल्ली कसोटीत कांगारू संघावर 6 विकेट्सने विजय मिळवला. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपली स्थिती निश्चितच मजबूत केली होती, मात्र तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र त्यांच्यासाठी खराब राहिले. यामुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया मोठे लक्ष्य देऊ शकले नाहीत. याचा परिणाम असा झाला की आता भारतीय संघाने या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

क्रीडा / क्रिकेटकिडा । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दिल्ली टेस्ट : LIVE SCORE

पुजारासोबत श्रीकर भरतने पाचव्या विकेटसाठी मैदानात येत झटपट धावा गोळा केल्या. तर पुजाऱ्याच्या विजयी चौकाराने भारताला दुसऱ्या कसोटीच्या तीसऱ्या दिवशीच दणदणीत विजय मिळवून दिला.

अधिक वाचा  :  कडू-कडू कारल्याचे आहेत गोड-गोड आरोग्यदायी फायदे

दरम्यान,  दुसऱ्या कसोटीच्या  विजयासाठी भारताच्या फिरकीपटूंनी आपली महत्त्वाची भूमिका बजावली. या दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आश्विन आणि जडेजाने दीड तासातच ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला.  त्यांच्या फिरकीमुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धावा करणं अवघड झालं. आणि  भारताला विजयासाठी फक्त 115 धावांचे लक्ष्य दिले.

अधिक वाचा  :  गरोदरपणात का खाऊ वाटतात आंबट पदार्थ

पहिल्या दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व

दिल्ली कसोटीमध्ये नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत  पहिल्या डावात 263  धावा केल्या.  तर भारताच्या डावात अक्षर पटेल, विराट कोहली, अश्विनच्या खेळीने भारताला 262 धावांचा पल्ला गाठता आला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा (81)आणि  पीटर हॅड्सकॉम्ब (72) धावा केल्या. या दोन खेळाडूशिवाय इतर खेळाडूंना चांगला खेळ करता आला नाही. यामुळे ऑस्ट्रेलिया संघ भारतापुढे माफक  263  धावांचे आव्हान दिलं. भारताकडून मोहम्मद शमीने 4 आणि जडेजा आणि अश्विनने 3-3 बळी घेतले. यानंतर पहिल्या दिवशी भारतीय संघाने एकही विकेट न गमावता 21 धावा केल्या होत्या.

अधिक वाचा  : मोबाईलशिवाय तुमचं काम होत नाही, मग होऊ शकतील या समस्या

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी ताकद दाखवली

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसले. 139 धावांवर 7 गडी गमावल्याने भारतीय संघ कठीण परिस्थितीत अडकला होता. या परिस्थितीत अक्षर पटेल  आणि  आर अश्विन फलंदाजीला आले त्यांनी 114 धावांची भागीदारी केली.  या भगीदारीमुळे भारतीय संघाने 262 धावा केल्या.  त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे एका धावेची लीड होती.  दरम्यान दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाने एक गडी गमावून 61 धावा केल्या होत्या. म्हणजेच एकूण आघाडी 62 धावांची झाली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ट्रेव्हिस हेड आणि लाबुशेन मैदानात होते. सामना सुरु होताच अश्विनने ट्रेव्हिस हेडला बाद करत विकेट्सची रांग सुरु करून दिली आणि नंतर पाहता पाहता अश्विन आणि जडेजाने कांगारूंचा सुफडा साफ केला. अश्विन आणि जडेजाने दमदार गोलंदाजी करत पुढच्या कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडा गाठू दिला नाही. 

भारताच्या डावात रोहित आणि केएल राहुलने सामन्याची सुरुवात केली. राहुल 1 धाव घेत झेलबाद झाला तर नंतर रोहितने शानदार फटकेबाजी करत 2 षटकार आणि 3 चौकार लगावत 20  चेंडूत 31 धावांची वादळी खेळी केली आणि धावबाद झाला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर संघासाठी धावा गोळा करत बाद झाले. नंतर पाचव्या विकेटसाठी आलेल्या श्रीकर भरतने 22 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारत झटपट 23 धावा केल्या. तर पुजाराने नाबाद राहत 4 चौकार मारत 31 धावांची खेळी खेळली आणि भारताला तिसऱ्या दिवशीच मोठा विजय मिळवून दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी