WTC Final 2023: 'या' माजी खेळाडूने गावस्कर-शास्त्रींना सुनावलं, म्हणाला आधी स्वतःकडे बघा मग...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Mar 21, 2023 | 14:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

WTC Final 2023 IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे. टीममधील प्लेअर्सवर अनेक दिग्गज प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, एका बड्या क्रिकेटरने भारताचे दिग्गज फलंदाज रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांना कडक शब्दांत सुनावलं आहे.

sunil gavaskar ravi shastri
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार फायनल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक युद्ध
  • गौतम गंभीरने सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक युद्ध

WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यापूर्वी भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे. टीममधील प्लेअर्सवर अनेक दिग्गज प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, एका बड्या क्रिकेटरने भारताचे दिग्गज प्लेअर रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांना कडक शब्दांत सुनावलं आहे. त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावरुन या माजी खेळाडूने या दिग्गज खेळाडूंना सुनावलं आहे. 

खेळाडूच्या क्षमतांचं मूल्यमापण कसं करू शकता?

भारताचा माजी ओपनर बॅट्समन गौतम गंभीरने सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केएस भरत चांगला यष्टिरक्षक नाही असं कसं म्हणता येईल? असा सवाल त्याने विचारला आहे. 'स्पोर्ट्स तक'वरील एका चर्चेत गंभीर म्हणाला की, तुम्ही फक्त 4 मॅचेसमध्ये एखाद्या खेळाडूच्या क्षमतांचं मूल्यमापण कसं करू शकता? इंग्लंडच्या परिस्थितीत भारतीय टीमसाठी एक योग्य पर्याय होऊ शकत नाही, राहुलला फायनल मॅचमध्ये खेळवायला हवं, असं गावस्कर आणि शास्त्री म्हणाले होते. यावरुनच गंभीरने प्रश्न उपस्थित केला आहे.

अधिक वाचा: IND vs AUS 2nd ODI : विशाखापट्टणममध्ये भारताचा डाव लवकर आटोपला

राहुलला फायनल सामन्यात स्थान

गंभीर पुढे म्हणाला की, जे म्हणत आहेत भरत चांगला विकेटकीपर नाही, त्यांनी आधी स्वतःकडे बघावं, ते किती वेळ फ्लॉप झाले आणि त्यांनी किती रन्स केल्या, याच आत्मपरीक्षण करावं. टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी चांगल्या विकेटकीपरला घेऊन उतरावं लागतं. केएल राहुलला फायनल सामन्यात स्थान मिळाले तर ते केवळ त्याच्या फलंदाजीमुळे. पण तो विकेटकीपर पार्ट टाईमच राहिलं आणि इंग्लंडमध्ये पार्टटाईम विकेटकीपरला घेऊन खेळणं योग्य होणार नाही. या दिग्गजांनी हे समजून घेतले पाहिजे की सामन्यातील एक छोटीशी संधी हुकली तरी संपूर्ण सामना बदलू शकतो.

अधिक वाचा: India Vs Australia 2nd odi: विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला रडवलं; 10 विकेट्स राखून टीम इंडियाला हरवलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार फायनल 

यावेळी ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आमने-सामने असतील. गेल्या मोसमातही भारताने फायनल गाठली होती पण न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा स्थितीत यावेळी टीम इंडिया फायनल जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. 7 जूनपासून ओव्हल क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी