Women's T20 World Cup Final: भारताचा 85 धावांनी पराभव, ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा चॅम्पियन

महिला T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला 85 धावांनी पराभव पत्कारावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमनं भारताला हरवून पुन्हा एकदा वर्ल्डकपवर आपलं नावं कोरलं.

Women's T20 World Cup Final
Women's T20 World Cup Final: भारताचा 85 धावांनी पराभव, ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा चॅम्पियन  

मेलबर्नः महिला T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला 85 धावांनी पराभव पत्कारावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमनं भारताला हरवून पुन्हा एकदा वर्ल्डकपवर आपलं नावं कोरलं. ऑस्ट्रेलियानं दमदार विजय मिळवत पाचव्यांदा वर्ल्डकप आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा  बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.  पहिल्यांदा बॅटिंगला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया टीमच्या अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांची शतकी भागीदारी आणि बॉलिंगच्या जोरावर विजयाच्या दिशेनं आगेकूच केली. 

टीम इंडियाचा कोणताही बॅट्समन किंवा बॉलर प्रभावी कामगिरी करू शकला नाही. कांगारू टीमनं 184 धावांची मोठी धावसंख्या रचली.  भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक धावा केल्या. तिनं 35 बॉलमध्ये 2 फोरसह 33 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शुतने चार, जेस जोनासनने तीन जणांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.तर सोफी मोलिनेक्स, निकोला कॅरी आणि डेलिसा किमिन्स यांनी प्रत्येकी एकाला आऊट केलं. 

भारताची निराशाजनक बॅटिंग 

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात अंत्यत खराब झाली.पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर सलामीवीर शैफाली वर्माची विकेट गेली. शैफालीनं 3 बॉलमध्ये  2 धावा केल्या. शैफाली आऊट झाल्यानंतर क्रीजवर आलेली विकेटकीपर बॅट्समन तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट होऊन परतली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स सुद्धा मैदानावर टिकू शकली नाही. तिला दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जेस जोनासननं पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 

ऑस्ट्रेलियाची जोरदार सुरुवात

ऑस्ट्रेलियानं निर्धारित 20 ओव्हरमध्ये चार विकेट गमावून 184 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियन टीमनं प्रथम बॅटिंगला सुरुवात केली. लिसा हेली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. दोघांनीही टीम इंडियाच्या बॉलर्संना प्रचंड अस्वस्थ केलं. ही भागीदारी राधा यादवने मोडली. तिनं 12 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर हेलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी