IND vs AUS 1st ODI: पाहा कुठे आणि केव्हा पाहाल पहिला वनडे सामना 

IndvsAus 1st ODI, Weather and pitch report: आज  भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला वनडे सामना खेळविण्यात येणार आहे. जाणून घ्या हा सामना आपल्याला कधी आणि कुठे पाहता येईल. तसंच जाणून घ्या वातावरण, खेळपट्टी कशी असेल.

ind vs aus know when and where to see the first odi and weather and pitch conditions
IND vs AUS 1st ODI: पाहा कुठे आणि केव्हा पाहाल पहिला वनडे सामना   |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिला सामना रंगणार मुंबईतील वानखेडे मैदानात
  • दुपारी दीड वाजेपासून पाहता येणार लाईव्ह सामना
  • टीम इंडियाचा नव्या वर्षातील पहिलाच वनडे सामना

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. नुकतंच टीम इंडियाने श्रीलंकेला टी२० मालिकेत २-० ने मात देत नव्या वर्षाची सुरुवात धडाकेबाज केली आहे. आता वेळ आहे ती ५० ओव्हरच्या फॉर्मेटची. ज्यामध्ये दिग्गज ऑस्ट्रेलियन संघ भारताला आव्हान देणार आहे. तीन वनडे सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्याशी निगडीत सर्व माहिती जाणून घ्या. 

कुठे आणि केव्हा होणार पहिला वनडे सामना? 

भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना मंगळवार (१४ जानेवारी) मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळविण्यात येणार आहे. 

किती वाजता सुरु होणार पहिला वनडे सामना? 

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळविण्यात येणारा पहिला वनडे सामना हा मंगळवारी दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. 

कुठे पाहता येणार भारत-ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना?

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेतील पहिला सामना आपण आज दुपारी १.३० वाजेपासून लाइव्ह स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर इंग्रजी आणि हिंदी कमेंट्रीसह पाहू शकता. ऑनलाइन लाइव्ह अपडेट्ससाठी आपण आमची वेबसाइट टाइम्स नाऊ मराठी नक्की पाहा.

 

कसं आहे मुंबईतील वातावरण? 

मुंबईत मंगळवारी चांगला सूर्यप्रकाश असेल. यावेळी तापमान २८ अंश सेल्सियस ते २० सेल्सियसच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. तसंच संध्याकाळी हवा वेगाने असण्याची शक्यता आहे. 

कशी आहे खेळपट्टी आणि मैदान? 

मुंबईच्या वानखडे मैदानावरील खेळपट्टी ही आदर्श क्रिकेट खेळपट्टी ठरू शकते. कारण की, फलंदाजांसोबतच गोलंदाजांना देखील ही खेळपट्टी बरीच मदत करु शकते. दरम्यान, काल (सोमवार) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने देखील म्हटलं होतं की, भारतातील वानखेडेची खेळपट्टी आणि मैदान हे त्याच्या सर्वात आवडीचं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी