India (IND) vs Australia (AUS) ODI Squad 2023: टेस्ट सीरिज नंतर आता टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन-डे सीरिजला सुरुवात होणार आहे. 17 मार्चपासून 22 मार्च या कालावधीत एकूण 3 वन-डे मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. बॉर्डर-गावस्कर सीरिज 2-1 ने जिंकल्यानंतर आता टीम इंडिया वन-डे सीरिजही जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
पहिल्या वन-डे मॅचमध्ये रोहित शर्मा टीम इंडियात नसेल. रोहित शर्माशिवाय टीम इंडियात मैदानात उतरणार आहे. पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. काही खासगी कारणास्तव रोहित शर्मा पहिल्या मॅचमध्ये खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टिप्स
17 मार्च 2023 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळली जाणार आहे. दुपारी 1.30 वाजता ही मॅच होईल.
रविवार 19 मार्च 2023 रोजी विशाखापट्टणम येथे दुपारी 1.30 वाजता होईल.
बुधवार 22 मार्च 2023 रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजता होईल.
हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के एल राहुल, ईशान किशन (वीकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मो. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकट, अक्षर पटेल.
हे पण वाचा : टॉवेल न धुतल्याने होऊ शकते मोठे नुकसान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन मॅचेसच्या वन-डे सीरिजचं थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनल्सवर पाहू शकाल. सर्व मॅचेस डे-नाईट असून दुपारी 1.30 वाजता मॅच सुरू होईल. मॅच सुरू होण्याच्या अर्धा तास आधी टॉस होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वन-डे सीरिजचं लाईव्ह स्ट्रिमिंग Disney + Hotstar वर तुम्हाला पाहता येईल.