IND vs AUS, T-20I: दुसऱ्या टी-20पूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका

IND vs AUS, T-20I: भारता विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियन टीमला एक झटका बसला आहे. कारण, दिग्गज प्लेअर दुखापतग्रस्त होत आहेत.

Australia Team
ऑस्ट्रेलियन टीम  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • भारता विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये कॅप्टन अॅरॉन फिंच खेळणार की नाही याबाबत संभ्रम 
  • कॅनबेरा मनुका ओव्हल ग्राऊंडवर पहिल्या टी-20मध्ये फिंचला झाली होती दुखापत
  • कॅप्टन अॅरॉन फिंचला विश्रांती दिल्यास टीमची धुरा कोणाकडे?

सिडनी : कॅनबेरा येथे टीम इंडिया (Team India) विरुद्ध खेळलेल्या पहिल्या टी-20 मॅच (1st T-20I match)मध्ये ऑस्ट्रेलियाला (Australia) पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासोबतच ऑस्ट्रेलियाची अडचण आणखी वाढली आहे कारण ऑस्ट्रेलियन टीमचे प्लेअर्स एकामागोमाग एक दुखापतग्रस्त होत आहेत. वन-डे सीरिजमध्ये डेव्हिड वॉर्नर जखमी झाल्यानंतर इतरही प्लेअर्स दुखापतग्रस्त झाले. टी-20 टीमचा कॅप्टन अॅरॉन फिंच (Aaron Finch) हा सुद्धा दुखापतग्रस्त झाला आहे.

पहिल्या टी-20 मॅच दरम्यान अॅरॉन फिंच दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या दुखापतीनंतर तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीचा रिपोर्ट येण्याची सर्वजण वाट पाहत आहेत. जर फिंचला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला तर टीमची धुरा कोणाकडे सोपवली जाणार याबाबत संभ्रम आहे. कारण, वाइस कॅप्टन पॅट कमिन्स यालाही विश्रांती देण्यात आली असून तो टीम बाहेर आहे. 

टीमची धुरा मॅथ्यू वेड कडे जाण्याची शक्यता 

असं म्हटलं जात आहे की, अॅरॉन फिंचला विश्रांती देण्याचा निर्णय झाल्यास ऑस्ट्रेलियन टीमची धूरा मॅथ्यू वेड याच्याकडे सोपवली जाऊ शकते. ज्याने स्थानिक क्रिकेटमध्ये व्हिक्टोरिया आणि तस्मानियाच्या टीमची धुरा सांभाळली होती. त्याला पहिल्या मॅचमध्ये वाइस कॅप्टन म्हणून टीममध्ये स्थान देण्यात आले होते. यापूर्वी सुद्धा त्याने ऑस्ट्रेलियन टीमचा वाइस कॅप्टन म्हणून धुरा सांभाळली आहे.

ऑस्ट्रेलियन टीममधील नॅथन लॉयन, मिशेल स्वीप्सन आणि डी आर्की शॉर्ट यांना राखीव म्हणून टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. स्वीप्सन याच्यानंतर मिशेललाही टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. दुखापतीमुळे फिंचला दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये विश्रांती देण्याचा निर्णय घेतला तर त्याची जागा डी आर्की शॉर्ट घेऊ शकतो. 

टी-२० सीरिजमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० सीरिजमधील पहिली मॅच भारताने जिंकली आहे. टीम इंडियाने प्रथम बॅटिंग करत 161 रन्स केले आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 रन्सचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला 20 ओव्हर्समध्ये 150 रन्स करता आल्या आणि ही मॅच टीम इंडियाने 11 रन्सने जिंकली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी