IND vs AUS Playing 11, T20 World Cup 2021: आज भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामन्यात असे असणार प्लेईंग ११

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 20, 2021 | 13:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Australia Playing 11 Today Match Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारी सराव सामना खेळवला जाणार आहे. जाणून घ्या कोणत्याखेळाडूंना प्लेईंग ११मध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

ind vs aus
IND vs AUS Playing 11: आज भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने 
थोडं पण कामाचं
  • भारत वि ऑस्ट्रेलिया वॉर्म अप सामना
  • दोन्ही संघाचा सामना दुबईच्या मैदानांवर होणार
  • दोन्ही संघानी गेल्या सराव सामन्यात विजय मिळवला आहे. 

IND vs AUS Warm-up Match Playing 11, T20 World Cup 2021: आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वॉर्म अप सामन्यात टक्कर होणार आहे. दोन्ही संघ दुबईच्या आयसीससी अॅकेडमी ग्राऊंडमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकतील. हा टी-२० वर्ल्डमधील सहावा सराव सामना असेल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघानी याआधी आपल्या पहिल्या वॉर्म अप सामन्यात विजय मिळवला होता. अशातच दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. विराट सेना आणि कांगारू सेना वर्ल्डकपमधील आपले अभियान सुरू करण्याआधी पुन्हा कदा आपल्या खेळाडूंच्या तयारीची चाचपणी करणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी हा सामना सुरू होतोय. 

कांगारूंसमोर भारताचे पारडे जड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० सामन्यांबाबत बोलायचे झाल्यास टीम इंडियाचे पारडे जड आहे. दोन्ही संघांनी २४ टी-२० सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाने १३ वेळेस विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया संघाला केवळ ९ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. दोन सामने अनिर्णीत राहिले. गेल्या ५ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. कांगारूंच्या संघाला तीन तर भारताला दोन सामन्यांमध्ये विजय मिळाला. दोन्ही संघ वर्ल्डकपमध्ये पाच वेळा आमनेसामने आलेत त्यात भारताने ३ तर ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले. 

कोणत्या खेळाडूंना मिळू शकते संी

सराव सामन्यात सर्व १५ खेळाडू भाग घेऊ  शकतात. मात्र केवळ ११ खेळाडूंनाच फलंदाजी अथवा गोलंदाजीची परवानगी असते. भारताने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा, मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती आणि ऑलराऊंडर शार्दूल ठाकूर यांना संधी दिली नव्हती. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे तिघे मैदानात उतरू शकतात. 

भारताचे संभाव्य प्लेईंग ११(India's Probable Playing 11)

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा/ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, राहुल चाहर/ वरुण चक्रवर्ती, रविचंद्रन अश्विन, भुवेश्वर कुमार/शार्दुल ठाकुर मोहम्‍मद शमी और जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेईंग ११ (Australia's Probable Playing 11)

आरोन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, मिशेल मार्श, मार्कस स्टॉयनिस/ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), एश्टन एगर, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन/पॅट कमिन्स, अॅडम जम्पा, जोश इंगलिस.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी