'कोहलीच्या अनुपस्थितीत 'या' खेळाडूला चमकण्याची मोठी संधी'

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 19, 2020 | 16:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. हे दोन संघ तीन एकदिवसीय सामने, तीन टी -२० आणि त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळतील.

IND vs AUS: Virat Kohli
IND vs AUS: विराट कोहली  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • कर्णधार विराट कोहली मर्यादित षटकांच्या मालिकेत आणि पहिल्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करेल
  • पहिल्या कसोटी सामन्यानंतर कोहली भारतात परत येणार आहे
  • आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी पत्नी अनुष्का शर्मासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. हे दोन संघ तीन एकदिवसीय सामने, तीन टी -२० आणि त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. या दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरला होणाऱ्या एकदिवसीय सामान्यांपासून होईल. कर्णधार विराट कोहली मर्यादित षटकांच्या मालिकेत आणि पहिल्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करेल.  पहिल्या कसोटी सामन्यानंतर कोहली भारतात परत येणार आहे, कारण त्याने आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी पत्नी अनुष्का शर्मासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का जानेवारीत मुलाला जन्म देईल.

'या खेळाडूला चमकण्याची मोठी संधी आहे'

भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे कसोटी मालिकेत कोहलीच्या अनुपस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होऊ शकतात. तथापि, अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांचा विश्वास आहे की कोहलीची अनुपस्थिती फलंदाज केएल राहुलसाठी नव्या संधीचे दरवाजे उघडेल. हरभजन म्हणतो की राहुल एका वर्षानंतर कसोटीत परतू शकतो आणि त्याच्याकडे चमकण्याची मोठी संधी असेल. पहिल्या कसोटीनंतर कोहली भारतात परतेल, पण यामुळे केएल राहुलसारख्या खेळाडूसाठी संधीचे दरवाजे उघडतील. कोहली हा एक मोठा खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला जातो तेव्हा धावा करतो. त्याच्या अनुपस्थितीत काही खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळेल.

'रोहित शर्मासाठी ही मोठी गोष्ट असेल'

हरभजन रोहित शर्माबद्दल बोलताना म्हणाला की रोहित जर कसोटी सामन्यात सलामीला आला तर ही त्याच्यासाठी चांगली संधी असेल. २०१९/२० च्या मोसमात सलामीची जबाबदारी रोहितवर होती, पण दुखापतीमुळे रोहितला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन करणार आहे. रोहितने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत ओपनिंग केली तर त्याच्यासाठी ही मोठी गोष्ट असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी