India vs Bangladesh 1st ODI Cricket match: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन मॅचेसच्या वन-डे सीरिजमधील पहिली मॅच रविवारी (4 डिसेंबर 2022) झाली. या मॅचमध्ये बांगलादेशने टीम इंडियाला पराभूत केलं आहे. टीम इंडियाला पराभूत करत तीन मॅचेसच्या वन-डे सीरिजमध्ये बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे. बांगलादेशने टीम इंडियावर एका विकेटने विजय मिळवला आहे. (IND vs BAN 1st ODI Bangladesh beat team India check live score updates in marathi)
मॅचच्या सुरुवातीला बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाकडून केएल राहुल वगळता इतर कुणालाही मोठा स्कोअर करता आला नाही. केएल राहुलने 70 बॉल्समध्ये 73 रन्सची इनिंग खेळली. टीम इंडिया 186 रन्सवर ऑलऑऊट झाली.
हे पण वाचा : लैंगिक संबंधांबाबत हे आहेत सामान्य समज-गैरसमज
बांगलादेशकडून शाकिब अल हसन याने सर्वाधिक म्हणजेच पाच विकेट्स घेतल्या. त्याने 10 ओव्हर्समध्ये 36 रन्स देत 5 विकेट्स घेतल्या. तर एबाडोट हुसैन याने 8.2 ओव्हर्समध्ये 47 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या आणि मिराजने 9 ओव्हर्समध्ये 43 रन्स देत एक विकेट घेतली.
हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती आपल्या भावना कशा प्रकारे लपवते? तुमची रास कोणती?
त्यानंतर टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशलाही टीम इंडियाने एक-एक झटके दिले. बांगलादेशचा ओपनर बॅट्समन नझमुल शांतो हा शून्यावर माघारी परतला. त्यानंतर लिट्ट्न दास याने टीमला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठा स्कोअर करण्यात त्यालाही अपयश आलं. अखेरीस मेहंदी हसन (Mehidy Hasan) याने चांगली खेळी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला.
हे पण वाचा : हिप्सला मॉडेल सारखा शेप देण्यासाठी 6 सोप्या टिप्स
टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप सेन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.