Bangladesh opt to bat, Axar and Umran in for India :
धावांचा पाठलाग करत असलेल्या आणि 50 ओव्हरमध्ये 272 धावा करण्याचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला लवकर दोन धक्के बसले. सलामीवीर विराट कोहली फक्त 5 धावा करून परतला. त्याला एबादत हुसेनने क्लीनबोल्ड केले. तर शिखर धवन 8 धावा करून मुस्तफिजुर रहमानच्या बॉलवर मेहदी हसनकडे झेल देऊन परतला. । स्कोअरकार्ड
बांगलादेशकडून 10व्या क्रमांकावर खेळणाऱ्या मेहदी हसनने नाबाद 100 तर 8व्या क्रमांकावर खेळणाऱ्या महमूदुल्लाहने 77 धावा केल्या. मेहदी हसन आणि महमूदुल्लाहच्या अप्रतिम खेळीमुळे बांगलादेशने भारतापुढे 272 धावांचे आव्हान ठेवले. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 7 बाद 271 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 3 तर उमरान मलिक आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. । स्कोअरकार्ड
टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशला 70च्या आत 6 धक्के बसले. बांगलादेशचा सलामीवीर अनामुल हक 11 धावा करून मोहम्मद सिराजच्या बॉलवर पायचीत झाला. कॅप्टन असलेला लिटन दास 7 धावा करून मोहम्मद सिराजच्या बॉलवर क्लीनबोल्ड झाला. उमरान मलिकने नजमुल हुसेन शांतो (21 धावा) याला क्लीनबोल्ड केले. यानंतर शाकिब अल हसनला (8 धावा) वॉशिंग्टन सुंदरने शिखर धवनकरवी झेलबाद केले. मुशफिकुर रहीमला (12 धावा) पण वॉशिंग्टन सुंदरने शिखर धवनकरवी झेलबाद केले. अफीफ हुसेनला (0 धावा) वॉशिंग्टन सुंदरने क्लीनबोल्ड केले. महमूदुल्लाह उमरान मलिकच्या बॉलवर केएल राहुलकडे झेल देऊन परतला. त्याने 77 धावा केल्या. । स्कोअरकार्ड
आज भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी वन डे मॅच शेर ए बांग्ला स्टेडियम ढाका येथे सुरू आहे. बांगलादेशने पहिली वन डे जिंकून 3 मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यामुळे आजची मॅच जिंकून आव्हान टिकवून ठेवण्याचे आव्हान भारतासमोर आहे. । स्कोअरकार्ड
आजच्या महत्त्वाच्या मॅचसाठी कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळत असलेल्या टीम इंडियात दोन बदल आहेत. शाहबाज अहमद ऐवजी अक्षर पटेल आणि कुलदीप सेन ऐवजी उमरान मलिकचा टीममध्ये समावेश झाला आहे. तर बांगलादेशने एक बदल केला आहे. हसन महमूद ऐवजी बांगलादेशच्या टीममध्ये नसुम अहमदचा समावेश झाला आहे.
टॉस जिंकून बांगलादेशने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
मॅचचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर तसेच सोनी लिव्ह (SONY LIV) या अॅपवर सुरू आहे.
भारत : रोहित शर्मा (कॅप्टन) , शिखर धवन , विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकीपर) , वॉशिंगटन सुंदर , अक्षर पटेल , शार्दुल ठाकुर , दीपक चहर , मोहम्मद सिराज , उमरान मलिक
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो , लिटन दास (कॅप्टन) , अनामुल हक , शाकिब अल हसन , मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर) , महमूदुल्लाह , अफीफ हुसेन , मेहदी हसन मिराज , नसूम अहमद , एबादत हुसेन , मुस्तफिजुर रहमान