व्हाईट वॉश टाळण्यासाठी टीम इंडियाचा प्रयत्न, जाणून घ्या 3rd ODI साठी भारत आणि बांगलादेशची Dream11 Team

IND vs BAN 3rd ODI in Chattogram, India And Bangladesh Dream11 Team : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरी वन डे उद्या म्हणजेच शनिवार 10 डिसेंबर 2022 रोजी आहे.

IND vs BAN 3rd ODI in Chattogram, India And Bangladesh Dream11 Team
व्हाईट वॉश टाळण्यासाठी टीम इंडियाचा प्रयत्न  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • व्हाईट वॉश टाळण्यासाठी टीम इंडियाचा प्रयत्न
  • जाणून घ्या 3rd ODI साठी भारत आणि बांगलादेशची Dream11 Team
  • टीममध्ये कुलदीप यादवचा समावेश

IND vs BAN 3rd ODI in Chattogram, India And Bangladesh Dream11 Team : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरी वन डे उद्या म्हणजेच शनिवार 10 डिसेंबर 2022 रोजी आहे. बांगलादेशने भारताविरुद्धच्या तीन वन डे मॅचच्या सीरिजमधील पहिल्या दोन मॅच जिंकल्या आहेत. आता तिसरी मॅच जिंकून बांगलादेश भारताला व्हाईटवॉश देणार की, भारत तिसरी मॅच जिंकून नामुष्की टाळणार याकडे अनेक क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. 

टीममध्ये कुलदीप यादवचा समावेश

तिसऱ्या वन डे मॅचसाठी टीम इंडियात चायनामॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलर कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे.

भारत वि. बांगलादेश दुसरी वन डे स्कोअरकार्ड

क्रिकेट

रोहित शर्मा, दीपक चहर, कुलदीप सेन नाही खेळणार

हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा तिसरी वन डे खेळणार नाही. तो मुंबईत वैद्यकीय सल्ला घेणार आहे. रोहित बांगलादेश विरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये खेळणार की नाही याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. हॅमस्ट्रिंगमुळे दीपक चहर आणि पाठीच्या दुखण्यामुळे कुलदीप सेन तिसऱ्या वन डे मॅचमध्ये खेळणार नाही. 

दुसऱ्या वन डे मॅचमध्ये दुखापतीमुळे रोहित शर्मा उपचार करून घेतल्यानंतर नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. याआधी हॅमस्ट्रिंगमुळे दीपक चहर त्याच्या कोट्याच्या फक्त 3 ओव्हर टाकू शकला. यामुळे भारताच्या दुसऱ्या वन डे मॅचच्या नियोजनावर परिणाम झाला. चहरला दुखापत होण्याची 4 महिन्यांतली ही तिसरी घटना आहे. यामुळे चहरच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे कुलदीप सेन पाठीच्या दुखण्यामुळे दुसऱ्या वन डे मॅचमध्ये खेळू शकला नाही. तो तिसऱ्या वन डे मॅचमध्येही खेळणार नाही. तीन खेळाडूंच्या गैरहजेरीत टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध आधी तिसरी वन डे मॅच खेळेल. नंतर 2 टेस्ट मॅच खेळेल.

मॅचचे थेट प्रक्षेपण

मॅचचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर तसेच सोनी लिव्ह (SONY LIV) या अॅपवर आहे. मॅचचे थेट प्रक्षेपण सकाळी 11.30 पासून सुरू होईल.

भारत आणि बांगलादेशची Dream11 Team

भारत : शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, शाहबाझ अहमद, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, कुलदीप यादव

बांगलादेश : अनामुल हक, लिटन दास (कॅप्टन), नजमुल हुसेन शंटो, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमूदुल्लाह, अफीफ हुसेन, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, एबादत हुसेन, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, यासिर अली, तस्कीन अहमद, नुरुल हसन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी