IND vs BAN Live Streaming 3rd ODI : भारत आणि बांगलादेश (India and Bangladesh) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या (Three ODIs series) मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज शनिवारी चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahoor Ahmed Chaudhary Stadium) खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ (Indian team) आपली विश्वासार्हता वाचवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल कारण सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे मालिका गमावली होती. हा तिसरा सामना जिंकून बांगलादेश भारताला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न करेल. भारताला या नकोशा विक्रमापासून वाचविण्यासाठी टीम इंडियाला चिअर अप करुन मेन इन ब्ल्यू ला जिंकून देऊ. पण टीम इंडियाला चिअर अप करण्यासाठी हा सामना कुठे पाहणार? पडला का प्रश्न ? काळजी नको याचं उत्तर आम्ही देतो. तुम्ही फक्त वेळ काढून या वीकेंडला टीव्हीचा रिमोट हाती घेऊन सामन्याचा आनंद लुटा. (IND vs BAN 3rd ODI : Cheer up to Team India; Where to watch India-Bangladesh 3rd ODI match)
अधिक वाचा : निलेश लंकेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस!
दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिले दोन एकदिवसीय सामने मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळले गेले. पहिल्या वनडेत भारताचा 1 विकेटने पराभव झाला तर दुसऱ्या वनडेत बांगलादेशने 5 धावांनी विजय मिळवला होता. त्यात बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या अडचणीतही वाढ झाली आहे. अनेक खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत मेन इन ब्लूसाठी क्लीन स्वीप वाचवणे सोपे असणार नाही. भारतीय संघाला चिअर अप करण्यासाठी सामना कुठे पाहणार.
अधिक वाचा : पंढरपूर कॉरिडॉरचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार : मिटकरी
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज शनिवारी म्हणजेच 10 डिसेंबर 2022 रोजी खेळवला जात आहे. चट्टोग्राममधील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर हा तिसरा एकदिवशीय सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळानुसार हा सामना सकाळी साडेअकरा वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यांची नाणेफेक 11 वाजता केली जाणार आहे.
अधिक वाचा : रासायनिक खतांमध्ये भेसळ करणाऱ्या दुकानाला सील
भारतातील सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत-बांगलादेश वनडे मालिकेतील या तिसर्या वनडेचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. तसेच या सामन्याचे थेट प्रेक्षपण हे सोनी लीव अॅपवरही (SONY LIV) होणार आहे. तेथेही तुम्ही या सामन्याचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला सुट्टी नसेल आणि फक्त धावसंख्या म्हणजेच स्कोअर जाणून घ्यायचा असेल तर टाइम्स नाऊ मराठीच्या साईटवर येऊन जाऊन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला टाइम्स नाऊ मराठीच्या वेबपोर्टलवर यावे लागेल. तेथील क्रिडा या पर्यायाला क्लिक करावे लागेल. संबंधित सामन्याच्या बातमीवर क्लिक करुन धावसंख्या किंवा स्कोअर जाणून घेता येईल.
केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.
लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, आणि तस्किन अहमद.
हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा तिसरी वन डे खेळणार नाही. तो मुंबईत वैद्यकीय सल्ला घेणार आहे. रोहित बांगलादेश विरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये खेळणार की नाही याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. हॅमस्ट्रिंगमुळे दीपक चहर आणि पाठीच्या दुखण्यामुळे कुलदीप सेन तिसऱ्या वन डे मॅचमध्ये खेळणार नाही.
दुसऱ्या वन डे मॅचमध्ये दुखापतीमुळे रोहित शर्मा उपचार करून घेतल्यानंतर नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. याआधी हॅमस्ट्रिंगमुळे दीपक चहर त्याच्या कोट्याच्या फक्त 3 ओव्हर टाकू शकला. यामुळे भारताच्या दुसऱ्या वन डे मॅचच्या नियोजनावर परिणाम झाला. चहरला दुखापत होण्याची 4 महिन्यांतली ही तिसरी घटना आहे. यामुळे चहरच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे कुलदीप सेन पाठीच्या दुखण्यामुळे दुसऱ्या वन डे मॅचमध्ये खेळू शकला नाही. तो तिसऱ्या वन डे मॅचमध्येही खेळणार नाही.