IND vs ENG, 4th T20I: टीम इंडियाचा इंग्लंडवर 8 रन्सने विजय

IND vs ENG, 4th T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या विजयामुळे पाच मॅचेसच्या सीरिजमध्ये दोन्ही टीम्सने 2-2 ने बरोबरी केली आहे.

India Vs England
भारत विरुद्ध इंग्लंड  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • चौथ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय 
  • टीम इंडियाकडून इंग्लंडच्या टीमचा पराभव

IND vs ENG, 4th T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-20 सीरिजमधील चौथी मॅच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली. ही मॅच टीम इंडियाने 8 रन्सने जिंकली आहे. या विजयामुळे आता पाच मॅचेसच्या सीरिजमध्ये दोन्ही टीम्सने 2-2 ने बरोबरी केली आहे. आता शेवटची मॅच जिंकणारी टीम सीरिज आपल्या नावावर करेल. पाचवी आणि शेवटची वनडे मॅच 20 मार्च 2021 रोजी अहमदाबाद येथे होईल. टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये आठ विकेट्स गमावत 177 रन्स केल्या आणि यामुळे टीम इंडियाने ही मॅच आठ रन्सने जिंकली आहे.

इंग्लंडच्या टीमला पहिलाच झटका बटलरच्या स्वरुपात बसला. जोस बटलर 9 रन्स करुन माघारी परतला. यानंतर जेसन रॉय याने टीमला सावरण्यास सुरुवात केली. मग डेविड मलान 14 रन्सवर आऊट झाला. जेसन रॉयने 40 रन्सची इनिंग खेळली. जॉनी बेअरस्टो याने 25 रन्स, बेन स्टोक्स 46, ईऑन मार्गनने चार, सॅम करनने तीन, जॉर्डनने 12 रन्स केले. 

टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या. राहुल चहर आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेतली.

टीम इंडियाने दिलं होतं 186 रन्सचं आव्हान

मॅचच्या सुरुवातीला इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावत 185 रन्स केले आणि इंग्लंडला विजयासाठी 186 रन्सचे आव्हान दिले. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक म्हणजेच 57 रन्सची इनिंग खेळली. श्रेयस अय्यरने 37, रिषभ पंतने 30, केएल राहुलने 14, रोहित शर्माने 12, हार्दिक पांड्याने 11, शार्दुल ठाकूरने नॉट आऊट 10 रन्स, केले.

इंग्लंडच्या टीमकडून जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक म्हणजेच चार विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर याने चार ओव्हर्समध्ये 33 रन्स देत चार विकेट्स घेतल्या. तर आदिल राशिद, मार्क वूड, बेन स्टोक्स, सॅम करन या चौघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी