IND vs ENG T20 World Cup 2022: टीम इंडियाचा (Team India)T20वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 202)2 मधील प्रवास संपला आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून (England)10 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजी (Batting) आणि गोलंदाजी (Bowling) या दोन्ही प्रमुख आघाड्यावर केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचे दुसऱ्यांदा ट्वेन्टी-20 विश्वचषक पटकावण्याचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान भारतीय संघाचे टी20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न का भंगले याचे कारण प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले आहे. (IND vs ENG: Dravid Guru told the real reason behind Indian team's defeat and England's victory)
अधिक वाचा : भारतीय कर्मचाऱ्याची रुजू झाल्यावर 2 दिवसात मेटातून हकालपट्टी
राहुल द्रविड म्हणाले की, इंग्लंडचे खेळाडू जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांना ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग (BBL) मध्ये खेळण्याचा फायदा झाला, ज्यामुळे त्यांना दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतावर 10 गडी राखून विजय मिळवण्यात मदत झाली. अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी साकारलेल्या उत्कृष्ट अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने गुरुवारी भारताला आस्मान दाखवलं. अॅडलेड ओव्हलच्या संथ खेळपट्टीवर भारतीय संघ सुरुवातीलाच अडचणीत सापडला होता. मात्र, हार्दिक पांड्याने 33 चेंडूंत 68 धावा ठोकल्याने भारतीय संघ 168 धावांवर पोहोचला. परंतु इंग्लंडच्या हेल्स आणि बटलर या सलामीवीरांनी हे आव्हान 16 षटकांतच पार करत इंग्लंडला अंतिम फेरीत पोहोचवले.
अधिक वाचा : संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी
बटलर (नाबाद 80) आणि हेल्स (नाबाद 86) यांनी अवघ्या 16 षटकांत 169 धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हेल्सने इंग्लंड संघात सर्वाधिक बीबीएल सामने खेळले आहेत, तो मेलबर्न रेनेगेड्स आणि सिडनी थंडरकडून खेळला आहे. विजयी संघाला याचाच फायदा झाल्याचे द्रविडने मान्य केले. द्रविड म्हणाले की, 'नक्कीच, इंग्लंडचे बरेच खेळाडू इथे येऊन खेळले आहेत, यात शंका नाही. या स्पर्धेतही त्या परिणाम दिसून आला आहे.
अधिक वाचा :गुरुवारची अशी पूजा केल्यास मिळेल धनसंपत्ती, लक्ष्मीचा कृपा
बीसीसीआय आपल्या कोणत्याही खेळाडूला परदेशी टी-20 लीगमध्ये खेळू देत नाही. जेव्हा द्रविडला बीबीएलमध्ये खेळण्याने भारतीयांना फायदा होईल का असे विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मला वाटते की भारतीय क्रिकेटसाठी हे खूप कठीण आहे कारण यातील बहुतेक स्पर्धा ह्या आपल्या देशांतर्गत हंगामातील स्पर्धेदरम्यान होत असतात. यामुळे मला वाटते की हे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. आमचे बरेच खेळाडू अशा अनेक लीगमध्ये खेळण्याची संधी गमावतात, परंतु जर तुम्हाला खेळायचे असेल तर ते बीसीसीआयने ठरवावे आहे.
भारतात रणजी करंडक स्पर्धा आयोजित केली जाते त्याच वेळी BBLचे आयोजन केले जाते. अशा परिस्थितीत खेळाडूंना इतर लीगमध्ये खेळण्याची संधी दिल्यास भारतातील देशांतर्गत स्पर्धा संपुष्टात येतील. हे (बीबीएल) आपल्या हंगामाच्या दरम्यान होत असतात. जर भारतीय खेळाडूंची मागणी पाहता, जर तुम्ही या खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली तर आपल्याकडील देशांतर्गत होणारे क्रिकेट सामनेचं संपून जातील. आमची देशांतर्गत ट्रॉफी, आमची रणजी ट्रॉफी संपेल आणि याचा अर्थ कसोटी क्रिकेटचा अंत होईल.