Ind Vs Eng Hockey Match CWG: टीम इंडिया वि इंग्लंड... हॉकी सामन्यात शेवटच्या क्षणी काय घडलं?

Ind Vs Eng Hockey Match: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सोमवारी टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेला सामना अखेर ड्रॉ झाला.

ind vs eng hockey match cwg team india lags behind at last chance draws against england
Ind Vs Eng: हॉकी सामन्यात शेवटच्या क्षणी काय घडलं?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने मोठी संधी गमावली
  • आघाडीवर असून टीम इंडियाला सामन्यात मिळवता आला नाही विजय
  • भारत-इंग्लंड सामना ४-४ ने बरोबरीत सुटला

CWG: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय हॉकी संघाची सोमवारी रात्री इंग्लंडशी गाठ पडली. या सामन्याचा निकाल लागू शकला नाही कारण सामना 4-4 असा बरोबरीत सुटला. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे, कारण एका क्षणी भारताने 3-0 अशी आघाडी घेतली होती. पण अखेरीस इंग्लंडने जोरदार पुनरागमन केले.

टीम इंडियाकडून आक्रमक सुरुवात करण्यात आली होती. पूर्वार्धात भारत ३-० ने आघाडीवर होता. मात्र दुसऱ्या हाफला सुरुवात होताच इंग्लंडने आपला खेळ बदलून आक्रमण करण्यास सुरुवात केली. शेवटच्या हाफमध्ये भारताला एकच गोल करता आला तर इंग्लंडने चार गोल केले.

अधिक वाचा: Lawn Bowls CWG 2022: लॉन बॉलमध्ये भारताने रचला इतिहास , महिला संघ 'फोर्स' च्या अंतिम फेरीत पोहोचून निश्चित केले पदक 

दोन्ही संघांमध्ये असा रंगला  सामना

सामन्याच्या पूर्वार्धाच्या अखेरीस टीम इंडियाने इंग्लंडवर 3-0 अशी आघाडी घेतली होती. भारताने शानदार खेळ सुरू केला होता एक क्षण असं वाटत होतं की, या सामन्यात टीम इंडिया इंग्लंडला सहजपणे धूळ चारू शकेल, पण शेवटी तसं घडलं नाही.

अधिक वाचा: Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल खेळांच्या चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंचे असे आहे वेळापत्रक

दुसऱ्या हाफला सुरुवात होताच इंग्लंडकडून पलटवार करण्यात आला आणि गोलवर गोल करण्यात आले. इंग्लंडने शेवटच्या क्वार्टरपर्यंत सामन्यात पुनरागमन करत स्कोअर बरोबरीत आणला. शेवटच्या क्षणी भारताची आघाडी हुकली आणि सामना 4-4 असा ड्रॉ झाला.

भारताकडून गोल

• पहिला गोल- ललित उपाध्याय (भारत)
• दुसरा गोल - मनदीप सिंग (भारत)
• तिसरा गोल - मनदीप सिंग (भारत)
• चौथा गोल- हरमनप्रीत सिंग (भारत)

अधिक वाचा: CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान अचानक या क्रिकेटरने घेतली निवृत्ती

इंग्लंडसाठी गोल

• फिलिप रोपर
• लियाम एन्सेल
• निकोलस बॅनडुर्क
• निकोलस बॅनडुर्क

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने जबरदस्त  सुरुवात केली होती. टीम इंडियाने आपल्या पहिल्याच सामन्यात घानाचा 11-0 असा पराभव केला होता. या सामन्यात हरमनप्रीतने टीम इंडियासाठी हॅट्ट्रिक केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी