महिला टी-२० विश्वचषक: भारतीय संघ फायनलमध्ये, पावसाने इंग्लंडला दाखवली घरची वाट 

कर्णधार हरमनप्रीत हिच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तुफान पावसाने इंग्लंडचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंग पावलं आहे. 

ind vs eng semifinal is called off due to rain india make it to their maiden t20 worldcup final
(फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: AP

सिडनी: भारतीय महिला क्रिकेट संघाने आज (गुरुवार) महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. ज्यामुळे भारताने थेट अंतिम सामना प्रवेशात मिळवला आहे. 'अ' गटातील चारही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळत आपल्या भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावले होते. त्याचाच फायदा त्यांना झाला आहे. अशा परिस्थितीत चौथ्यांदा पावसाने भारतीय संघाला मदत केली. तर दुसरीकडे इंग्लंडच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीसाठी आयसीसीला रिझर्व्ह डे ठेवण्याची विनंती केली होती. पण आयसीसीने तूर्तास तरी तसं करता येणार नसल्याचं म्हणत रिझर्व्ह डेसाठी नकार दिला होता. 

दरम्यान, दुसरा उपांत्य सामन्य देखील आजच होणार आहे. पण या सामन्यावर देखील पावसाचं सावट आहे. द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळविण्यात येणार आहे. ज्या मैदानावर भारतीय संघाचा सामाना होता त्याच मैदानावर हा देखील सामना खेळविण्यात येणार आहे. मात्र, इथे सध्या अतिशय जोरदार पाऊस सुरु आहे. जर पाऊस थांबलाच नाही तर ग्रुप बीमध्ये अव्वल असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम सामन्यात जाईल. अ गटात भारताकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले आणि त्यामुळेच जर आजच्या सामन्यात पावसाचीच फटकेबाजी सुरु राहिली तर इंग्लंडप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचं आव्हान देखील संपुष्टात येईल. 

भारताने या विश्वचषकाची विजयी सुरुवात ही चार वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियावर मात करुन केली. त्यानंतर अ गटातील बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांन पराभूत करुन अव्वल स्थान पटकावलं.

वेस्ट इंडिजमधील मागील टी -२० विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताला आठ विकेट्सने पराभूत केले होतं. तर २००९, २०१२, २०१४  आणि २०१६ मध्ये टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडावं लागलं होतं.  पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात खेळलेले सात खेळाडू हे आजच्या संघात आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी