IND vs NED: सामन्याच्या वेळेपासून ते Playing 11 पर्यंतचे अपडेट घ्या जाणून...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 27, 2022 | 11:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup 2022: टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये टीम इंडिया आपला दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाची नजर हा सामना जिंकत पॉईंट्सटेबलवर अव्वल स्थानावर पोहोचण्याकडे असणार आहे. 

team india
सामन्याच्या वेळेपासून ते Playing 11 पर्यंत अपडेट घ्या जाणून 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला गेलेला सामना भारतीय वेळेनुसार 1.30 वाजता सुरू झाला होता.
  • मात्र नेदरलँड्सविरुद्धचा सामना 12.30 वाजल्यापासून सुरू होणार
  • या सामन्याचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता

मुंबई: टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) मध्ये टीम इंडिया आज 27 ऑक्टोबरला आपला दुसरा सामना खेळणार आहे. पाकिस्तानला(pakistan) हरवल्यानंतर आता टीम इंडिया(team india) नेदरलँड्सविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाईल. टीम इंडियाचे ध्येय आता दुसरा सामना जिंकण्याकडे असणार आहे. जाणून घ्या या सामन्याबद्दलचे सर्व अपडेट...IND vs NED:  match timings to playing 11 know all update 

अधिक वाचा - लॅपटॉपवर काम करून थकतात हात आणि बोटं

1.30 वाजल्यापासून नाही आहे सामना

भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला गेलेला सामना भारतीय वेळेनुसार 1.30 वाजता सुरू झाला होता. मात्र नेदरलँड्सविरुद्धचा सामना 12.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे तर टॉस 12 वाजता होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. टीम इंडियाने आपला पहिला सामना जिंकला होता मात्र नेदरलँड्सला आपल्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. 

भारत-नेदरलँड्सवर पावसाचा धोका

दोन्ही संघादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावटआहे. सिडनीचा हवामान रिपोर्ट सध्या चांगला नाही. सिडनीमध्ये 27 ऑक्टोबरला पावसाची 80% शक्यता आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या गेल्या सामन्यात पावसाची शक्यता 80% होती मात्र सामना संपूर्ण 20-20 ओव्हरचा खेळवण्यात आला होता. अशातच हा सामनाही पूर्ण होण्याची चाहत्यांना अपेक्षा आहे. 

भारताच्या सलामीवीरांकडून मोठ्या खेळीची आशा

टीम इंडिया या सामन्यात कोणत्याही बदलाशिवाय मैदानावर उतरू शकते. टीम इंडियाला गेल्या सामन्यात शेवटच्या बॉलवर विजय मिळाला होता. या सामन्यात टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. अशातच चाहत्यांना या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. 

अधिक वाचा - आईच्या डोक्यात घातला ओंडका, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

टीम इंडियाचे संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.

नीदरलँड्सचे संभाव्य प्लेइंग 11

विक्रमजीत सिंह, मैक्स ओडॉड, कॉलिन एकरमैन, टॉम कूपर, बास डी लीड, स्कॉट एडवर्ड्स, रूलोफ वैन डेर मेर्वे, लोगान वैन बीकी, टिम प्रिंगल, पॉल वैन मीकेरेन, फ्रेड क्लासेन.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी