IND vs NZ 1st ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली वन-डे मॅच, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल LIVE Streaming

IND vs NZ 1st ODI match live streaming, telecast channel: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 सीरिज संपल्यावर आता वन-डे सीरिज सुरू होत आहे. पहिली वन-डे मॅच कधी, कुठे आणि कशी लाईव्ह पाहू शकता जाणून घ्या...

IND vs NZ 1st ODI india vs new zealand match live streaming watch on dd sports amazon prime video live telecast
IND vs NZ 1st ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली वन-डे मॅच, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल LIVE Streaming (Photo: BCCI Twitter) 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन मॅचेसची वन-डे सीरिज
  • शुक्रवारी (25 नोव्हेंबर) होणार पहिली वन-डे मॅच
  • टी-20 सीरिज जिंकल्यावनर आता वन-डे सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार

IND vs NZ 1st ODI match live streaming, date, time, weather: न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने टी-20 सीरिज आपल्या शिखात टाकली. त्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वन-डे सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणआर आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात शुक्रवारी (25 नोव्हेंबर 2022) पहिली वन-डे मॅच होणार आहे. ही मॅच तम्ही कधी, कशी आणि कधी लाईव्ह पाहू शकता. जाणून घेऊयात... (IND vs NZ 1st ODI match live streaming)

भारत वि. न्यूझीलंड यांच्यातील पहिली वन-डे मॅच कधी? (IND vs NZ 1st ODI match date)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली वन-डे मॅच शुक्रवारी (25 नोव्हेंबर 2022) रोजी होणार आहे.

हे पण वाचा : गुळाचा एक तुकडा बदलेल तुमचं आयुष्य, केवळ करावा लागेल हा उपाय

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली वन-डे मॅच कुठे खेळली जाणार? (IND vs NZ 1st ODI match venue)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली वन-डे मॅच न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील ईडेन पार्क येथे होणार आहे.

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली वन-डे मॅच किती वाजता सुरू होणार? (IND vs NZ 1st ODI match timing in India)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली वन-डे मॅच भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता सुरू होईल.

हे पण वाचा : कुटुंबासोबत सिनेमा पाहताना तसा सीन आल्यावर कोणत्या राशीची व्यक्ती कशी वागते

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली वन-डे मॅच दरम्यान हवामान कसे असेल? (IND vs NZ 1st ODI match pitch report, weather forecast)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी पहिली वन-डे मॅच ऑकलंड येथे होणार आहे. हे मैदान बॅट्समन आणि बॉलर्ससाठी खूपच खास ठरणार आहे. या ठिकाणी शेवटची वन-डे मॅच दोन वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2020 मध्ये खेळण्यात आली होती. ही मॅच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाली होती. या मॅचमध्ये न्यूझीलंडने आधी बॅटिंग करताना 273 रन्स केले होते. तर हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 251 रन्स केले होते आणि टीम इंडियाचा 22 रन्सने पराभव झाला होता.

ऑकलंडमधील वातावरणाचं बोलायचं झालं तर शुक्रवारी येथे ढगाळ वातावरण असू शकते. मात्र, पाऊस पडण्याची शक्यता नाहीये. येथे कमाल तापमान 18 अंश सेल्सियस तर किमान तापमान 13 अंश सेल्सियस इतके असण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा : या फुटबॉल प्लेअर्सच्या गर्लफ्रेंडचा जलवा, फोटोजने लावली सोशल मीडियात आग

भारत वि. न्यूझीलंड पहिली वन-डे मॅच भारतात कुठे पाहता येईल लाईव्ह? (IND vs NZ 1st ODI match live streaming, Live telecast tv channel)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली वन-डे मॅच भारतात तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनलवर पाहू शकता. या मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही Amazon Prime Video वर ऑनलाईन लाईव्ह पाहू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी