IND vs NZ 1st T-20: न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा 21 रन्सने पराभव 

IND vs NZ 1st T20I match report: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 सीरिजमधील पहिली मॅच रांचीतील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पार पडली.

IND vs NZ 1st T-20 I match
(Photo: BCCI)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सीरिज
  • तीन टी-20 मॅचेसच्या सीरिजमधील पहिली मॅच शुक्रवारी (27 जानेवारी 2023) रांचीत खेळली गेली

India vs New Zealand 1st T-20I match scorecard: न्यूझीलंड विरुद्धच्या तीन मॅचेसच्या टी-20 सीरिजमधील पहिली मॅच शुक्रवारी (27 जानेवारी 2023) रांचीत झाली. या मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीमने 9 विकेट्स गमावत 155 रन्सपर्यंतच मजल मारली आणि पहिल्या टी-20 मॅचमध्ये न्यूझीलंडचा 21 रन्सने विजय झाला. 

मॅचच्या सुरुवातीला टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या न्यूझीलंडच्या टीमने सहा विकेट्स गमावत 176 रन्स केल्या. न्यूझीलंडच्या टीमकडून डेवोन कॉनवे आणि डेरिल मिशेल यांनी तुफानी इनिंग खेळली. ओपनिंगला आलेल्या फिन अ‍ॅलेन याने 23 बॉल्समध्ये 35 रन्स केल्या. तर डेवोन कॉनवे याने 35 बॉल्समध्ये 52 रन्स केल्या. मार्क चॅपमॅन शून्यावर आऊट, ग्लेन फिलिप्सने 22 बॉल्समध्ये 17 रन्स केल्या. डेरिल मिशेलने नॉट आऊट 59 रन्सची इनिंग खेळली.

हे पण वाचा : नॉर्मल डिलिव्हरीसाठी जबरदस्त उपाय, सिझेरियनला करा बायबाय

टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक म्हणजेच दोन विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने चार ओव्हर्समध्ये 22 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि शिवम मावी या तिघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

हे पण वाचा : बडीशेप खा आणि चमत्कार पहा

न्यूझीलंडच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. ओपनर बॅट्समन ईशान किशन अवघ्या चार रन्स करुन माघारी परतला. राहुल त्रिपाठी शून्यावर आऊट झाला तर शुभमन गिल याने 7 रन्स करुन माघारी परतला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी टीमला सावरलं. मात्र, सूर्यकुमार यादव 47 रन्स करुन माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याही 21 रन्सवर आऊट झाला. वॉशिंग्टन सुंदरने 50 रन्सची इनिंग खेळली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी