Virat Kohli Record : न्यूझीलंडविरुद्ध ( New Zealand)सुरू असलेल्या एकदिवशीय सामन्यातील (ODI match) पहिल्या विजयानंतर भारतीय संघ दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. आज रायपूरमध्ये (Raipur) भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा आहे. आज दुपारी (21 जानेवारी 2023) 1.30 वाजता थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. परंतु या सामन्यापेक्षा विराट कोहलीच्या नव्या विक्रमाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. (IND vs NZ, 2nd ODI :attention on Kohli's new record than the result of match, know the record)
अधिक वाचा :सात तास बैठकीनंतर बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई
या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची बॅट तळपली तर एक मोठा विक्रम तो आपल्या नावावर करू शकतो. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही खेळाडू करु शकला नाहीये. आज विराट कोहलीला शतक ठोकण्यासोबत 111 धावा करणे गरजेच आहे. कारण आजच्या मॅचमध्ये विराटने 111 धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरेल. हा रेकॉर्ड माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. पण सध्या खेळत असलेल्या कुठल्याही खेळाडूने एवढी मोठी धावसंख्या केलेली नाही. जर आज विराटची बॅटने कमाल दाखविल्यास हा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे.
अधिक वाचा : धक्कादायक!, भररस्त्यात नायब तहसीलदाराला जाण्याचा प्रयत्न
विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24,889 धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 34357 धावसंख्या केली आहे.
2. कुमार संगकारा (श्रीलंका) - 28016 धावा
3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 27483 धावा
4. महेला जयवर्धने (श्रीलंका)- 25957 धावा
5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 25534 धावा
6. विराट कोहली (भारत) - 24889 धावा
अधिक वाचा : ही एक गोष्ट आहे व्यक्तीच्या समस्यांचं खरं कारण
1. सचिन तेंडुलकर (भारत) - 100 शतकं
2. विराट कोहली (भारत) - 74 शतकं
3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 71 शतकं
4. कुमार संगकारा (श्रीलंका) - 63 शतकं
5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 62 शतकं
6. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) - 55 शतकं
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर एदकिवशीय जबरदस्त विक्रम करणार फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यात 49 शतकं आणि कसोटी सामन्यात 51 शतकं केली आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या एकदिवसीय विक्रमापासून विराट कोहली चार हात लांब असून येत्या काही सामन्यात तो हे अंतर कापून आपल्या नावावर नवा विक्रम करेल यात शंका नाही. देशांतर्गत मैदानावर विराटने सर्वाधिक शतकं ठोकली आहेत.
विराट कोहली हा धावा करण्याचा भुकेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोहलीच्या स्टाइट्र रेट पाहिल्यानंतर तो फलंदाजीत किती निपुण आहे हे आपल्या लक्षात येतं. कोहलीने सहा समान्यांमध्ये 150 चा आकडा पार केला आहे. त्यातील चार सामन्यात 150 चा आकडा पार करताना विराट नाबाद राहिला आहे.