IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने सीरिजही जिंकली

IND vs NZ 2nd ODI updates: न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. 

IND vs NZ 2nd ODI team india beat new zealand
IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने सीरिजही जिंकली (Photo: BCCI Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड वन-डे सीरिज
  • दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय
  • तीन मॅचेसच्या वन-डे सीरिजमधील दोन्ही मॅचेस जिंकत टीम इंडियाने सीरिजही जिंकली

IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाने अगदी सहज विजय मिळवला आहे. मॅचच्या सुरुवातीला भारतीय बॉलर्सने आपली जादू दाखवत न्यूझीलंडच्या बॅट्समनला चांगलाच घाम फोडला. न्यूझीलंडची संपूर्ण टीम 108 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यानंतर हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने अगदी सहज हे आव्हान गाठलं आणि विजय मिळवला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने वन-डे मॅचेसची सीरिजही आपल्या नावावर केली आहे. टीम इंडियाने आठ विकेट्स राखत न्यूझीलंडवर विजय मिळवला.

न्यूझीलंडने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या ओपनर बॅट्समनने चांगली सुरुवात केली. ओपनर रोहित शर्मा याने 51 रन्सची इनिंग खेळली. तर त्याला साथ दिली शुभमन गिल याने. शुभमन गिल याने नॉट आऊट 40 रन्सची इनिंग खेळली. रोहित शर्मा 51 रन्स करुन आऊट झाल्यावर मैदानात आलेल्या विराट कोहली 11 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर ईशान किशन याने नॉट आऊट 11 रन्स केल्या. टीम इंडियाने 20.1 ओव्हर्समध्ये 111 रन्स करत वन-डे मॅच जिंकली आहे.

मॅचच्या सुरुवातीला टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फिल्डिंगसाठी मैदानात आलेल्या टीम इंडियाच्या बॉलर्सने आपली जादू दाखवत न्यूझीलंडच्या टीमला गारद केले. न्यूझीलंडच्या टीमची सुरुवातच खूप खराब झाली. न्यूझीलंडच्या टीममधील पहिल्या पाच बॅट्समनला दोन अंकी रन्स सुद्धा करता आल्या नाहीत. ओपनर फिन अ‍ॅलेन हा तर शून्यावर आऊट झाला. डेवोन कॉनवे सात रन्स, हेनरी निकोल्स दोन रन्स, डेरिल मिशेल एक रन, टॉम लॅथम एक रन करुन माघारी परतले.

हे पण वाचा : नॉर्मल डिलिव्हरीसाठी जबरदस्त उपाय, सिझेरियनला करा बायबाय

यानंतर ग्लेन फिलिप्सने टीमला सावरण्याचा प्रयत्न केला. ग्लेन फिलिप्सला मायकल ब्रेसवेल याने चांगली साथ दिली. ग्लेन फिलिप्सने 36 रन्स केल्या तर मायकल ब्रेसवेल 22 रन्सवर आऊट झाला. मिशेल सेंटनर 27 रन्स करुन माघारी परतला.

हे पण वाचा : शुक्राचं कुंभ राशीत गोचर, या 5 राशींच्या प्रेम जीवनात रोमान्स वाढेल

टीम इंडियाच्या बॉलर्सची जादू

टीम इंडियाच्या बॉलर्सची मैदानात जादू पहायला मिळाली. मोहम्मद शमी याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी दोन - दोन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

हे पण वाचा : ओव्याचे गुणकारी फायदे तुम्हाला माहितीयेत का?

मोहम्मद शमी याने 6 ओव्हर्समध्ये 18 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने 3 ओव्हर्समध्ये 7 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने 6 ओव्हर्समध्ये 16 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज याने सहा ओव्हर्समध्ये 10 रन्स देत एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी