IND vs NZ 2nd T-20: सूर्यकुमारची झुंझार खेळी अन् भारतीय बॉलर्सची दमदार कामगिरी,  टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 65 रन्सने विजय

India vs New Zealand 2nd T-20: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. ही मॅच जिंकत टीम इंडियाने सीरिजमध्ये आघाडी घेतली आहे. 

IND vs NZ 2nd t20 team india beat new zealand
IND vs NZ: टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय  |  फोटो सौजन्य: AP
थोडं पण कामाचं
  • न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय
  • टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यात न्यूझीलंडला अपयश
  • तीन मॅचेसच्या सीरिजमध्ये टीम इंडियाची आघाडी

IND vs NZ 2nd T-20I: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन मॅचेसच्या टी-20 सीरिजमधील दुसरी मॅच रविवारी (20 नोव्हेंबर 2022) पार पडली. या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने दमदार बॅटिंग करत नॉट आऊट 111 रन्सची इनिंग खेळली. टीम इंडियाने 6 विकेट्स गमावत 191 रन्स केल्या. त्यानंतर हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या टीमने भारतीय बॉलर्ससमोर सपशेल नांगी टाकली. न्यूझीलंडची टीम 18.5 ओव्हर्समध्ये ऑल आऊट झाली. न्यूझीलंडच्या टीमला 126 रन्सपर्यंतच मजल मारता आली आणि त्यामुळे टीम इंडियाने ही मॅच 65 रन्सने जिंकली आहे.

न्यूझीलंडच्या टीमने टॉस जिंकल प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 6 विकेट्स गमावत 191 रन्स केल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने नॉट आऊट 111 रन्स केल्या. इशान किशनने 31 बॉल्समध्ये 36 रन्स केल्या. श्रेयस अय्यरने 13 रन्स आणि हार्दिक पांड्यानेही 13 रन्स केल्या.

हे पण वाचा : कतारमधील यंदाच्या FIFA World Cup काय आहे खास? वाचा

न्यूझीलंडच्या टीमकडून टीम सौथीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 ओव्हर्समध्ये 34 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या. लकी फर्ग्यूसनने 4 ओव्हर्समध्ये 49 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. तर सोधी याने एक विकेट घेतली. 

हे पण वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात

टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या टीमकडून केवळ केन विल्यम्सन याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही चांगली इनिंग खेळली नाही. केन विल्यम्सन याने 52 बॉल्समध्ये 61 रन्सची इनिंग खेळली. कॉन्वे याने 22 बॉल्समध्ये 25 रन्स केल्या. ग्लेन फिलिप्सने 12 रन्स केल्या.

टीम इंडियाकडून दीपक हुड्डा याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. दीपक हुड्डाने 2.5 ओव्हर्समध्ये 10 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहल याने दोन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजनेही दोन विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कमार, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी