IND vs NZ 2nd Test : आठवड्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने दिली गुड न्यूज; न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव, कसोटीसह भारताने मालिकाही जिंकली

India Won 2ndTest Match Against New Zeland : दुसऱ्या कसोटीत (Test Match) भारताने (India) न्यूझीलंडवर (New Zeland) 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चौथ्या दिवसांचा खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या तासाभरात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीचा फडशा पाडत सामना जिंकला.

New Zealand lost by 372 runs, India won the Test and the series
IND vs NZ 2nd Test : न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी भारताने जिंकली
  • मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोघांची टक्कर झाली.
  • भारताने न्यूझीलंडसमोर ५४० धावांचे लक्ष्य ठेवले होते.

India Won 2ndTest Match Against New Zeland : मुंबई : दुसऱ्या कसोटीत (Test Match) भारताने (India) न्यूझीलंडवर (New Zeland) 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चौथ्या दिवसांचा खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या तासाभरात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीचा फडशा पाडत सामना जिंकला. भारताच्या रविंद्रचंद्र अश्विन(Ravindra Chandra Ashwin) आणि जयंत यादव (Jayant Yadav) यांनी प्रत्येकी चार बळी टिपत किवींचा डाव अवघ्या 167 धावांत गुंडाळला. भारताने किवीच्या संघाला 540 धावांचे आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाचा दुसरा डाव  56.3 षटकात 167 धावा करत बाद झाला. 

कानपूर येथे झालेली पहिली कसोटी नाट्यमयरीत्या अनिर्णित राहिली होती. पहिल्या कसोटीत भारताचा विजय हुकला होता. त्यामुळे मालिकेतील दुसरी कसोटी अतिशय निर्णायक होती.  मुंबई कसोटी सामना जिंकून भारताने कसोटी मालिका आपल्या खिश्यात टाकली आहे. दोन्ही संघादरम्यान पहिला सामना कानपूर येथील ग्रीन पोर्ट मैदानावर झाला होता. कानपूर येथे झालेली पहिली कसोटी नाट्यमयरीत्या अनिर्णित राहिली होती. पहिल्या कसोटीत भारताचा विजय हुकला होता. त्यामुळे मालिकेतील दुसरी कसोटी अतिशय निर्णायक होती.  

गोलंदाजांनी किवीला लोळवलं 

भारताला विजयासाठी अवघ्या 5 बळींची आवश्यकता होती. भारताचा विजय न्यूझीलंडचे फलंदाज किती लांबवतात याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी चाहत्यांना विजयासाठी फार वेळ प्रतिक्षा करायला लावली नाही. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा फिरकीपटू जयंत यादव हा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. रचिन रविंद्रला 18 धावांवर बाद करत जयंत यादवने दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर जयंत यादवने न्यूझीलंडला एकाच षटकात दोन धक्के दिले. काइल जेमीसन आणि टीम साऊथी यांना त्याने भोपळा फोडण्याचीही संधी दिली नाही. एकाच षटकात दोघेही बाद झाले. त्यानंतर विल्यम सोमरव्हिलेला तंबूत माघारी धाडत किवींना 9 वा धक्का दिला. त्यानंतर रविचंद्र अश्विनने हेनरी निकोल्सला बाद करत भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. 

भारताचा दुसरा डाव 276 धावांवर घोषित 

तत्पूर्वी, भारताने तिसऱ्या दिवशी 7 बाद 276 धावांवर दुसरा डाव घोषित केला होता. त्याआधी भारताने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव अवघ्या 62 धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर 263 धावांची भक्कम आघाडी घेत भारताने पाहुण्या संघासमोर कठीण लक्ष्य ठेवले. भारतासाठी दुसऱ्या डावात सलामीवीर मयंक अग्रवाल (62), चेतेश्वर पुजारा (47), शुभमन गिल (47), अक्षर पटेल (नाबाद 41) आणि कर्णधार विराट कोहली (36) धावा करत यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात सर्व 10 बळी घेणारा फिरकीपटू एजाज पटेल याने चार तर रचिन रवींद्रने तीन बळी घेतले.

तिसऱ्याच दिवशी किवींचा पराभव निश्चित

भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाची खराब सुरुवात झाली. अश्विनने सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांना बाद केले. त्यानंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रॉस टेलर बाद झाला. मात्र, दुसरीकडे डॅरिल मिशेलनं संघाचा डाव सावरला आणि त्यानं 92 चेंडूत 60 धावा केल्या. परंतु, 35 व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्यानंतर टॉम ब्लंडल 37 व्या षटकात धावचीत झाला. तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने पाच बळी गमावून 140 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी न्यूझीलंडचा पराभव निश्चित केला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी