IND vs NZ 2nd Test: दुसऱ्या कसोटीत या प्लेईंग ११ सोबत उतरू शकते टीम इंडिया

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 02, 2021 | 15:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs NZ: दुसऱ्या कसोटीत नियमित कर्णधार विराट कोहली संघात परतत आहे. अशातच प्लेईंग ११मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. 

team india
IND vs NZ: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेईंग ११ 
थोडं पण कामाचं
  • अजिंक्य रहाणेला दुसऱ्या कसोटीतून बाहेर काढले जाऊ शकते.
  • दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वृद्धिमन साहा फिट झाला नाही तर केएस भरतला प्लेईंग ११मध्ये संधी दिली जाऊ शकते. 
  • टीम इंडिया शेवटच्या सामन्यात काही बदलांसह मैदानावर उतरू शकते.

Second Test in Mumbai । मुंबई: भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या(new zealand) कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली(Virat Kohli) संघात परतणार आहे. याशिवाय टीम इंडिया(team india) शेवटच्या सामन्यात काही बदलांसह मैदानावर उतरू शकते. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकत मालिका जिंकता येते. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत ठरला आणि भारतीय संघ विजयाच्या जवळ जाऊन अपयश आले होते. अशातच दोन्ही संघ यावेळी कोणतीही चूक करणार नाहीत. टीम इंडियाच्या संभाव्य प्लेईंग ११सह काही महत्त्वपूर्ण बाबींवर एक नजर टाकूया. Team India Probable Playing 11 for india vs new zealand second test match

अजिंक्य रहाणेचा पत्ता होऊ शकतो कट

पहिल्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व कऱणाऱ्या अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात ३५ आणि दुसऱ्या डावात केवळ ४ धावा केल्या. रहाणे बऱ्याच काळापासून खराब फॉर्मात आहे. अशात परिस्थितीत रहाणेला दुसऱ्या कसोटीतून बाहेर काढले जाऊ शकते. याशिवाय मयांक अग्रवाल अथवा चेतेश्वर पुजारा यापैकी एका खेळाडूला बाहेर केले जाऊ शकते. दरम्यान, टीम मॅनेजमेंट रहाणेला शेवटच्या सामन्यात संधी देणार की नाही हे पाहावे लागेल. 

अशी असू शकते संभाव्य प्लेईंग ११

शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव.

ऋद्धिमन साहाच्या खेळण्यावर सस्पेंन्स

पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकीपर वृ्द्धिमन साहाने शानदार कामगिरी करत अर्धशतकी खेळी केली होती. मात्र तो दुखापतग्रस्त झाला होता. जर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो फिट झाला नाही तर केएस भरतला प्लेईंग ११मध्ये संधी दिली जाऊ शकते. 

राहुल द्रविडची मोठी मदत

उत्तर प्रदेश क्रिकेट संघाने खेळानंतर प्रेस बॉक्समध्ये अधिकृत घोषणा केली, आम्ही एक अधिकृत घोषणा करू इच्छितो. राहुल द्रविड यांनी मैदानातील कर्मचाऱ्यांना व्यक्तिगतपणे ३५ हजार रूपये दिले आहेत. निष्पक्ष खेळ भावना कशी जोपासावी हे द्रविडने आपल्या खेळीदरम्यान अनेकदा दाखवले आहे. मैदानाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेली ही रक्कम याचे प्रतीक होते की पिचमध्ये सामन्याच्या पाचही दिवशी गोलंदाज आणि फलंदाजांसाठी काहीतरी होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी