IND vs NZ, 5th T20I:होम ग्राऊंडवर न्यूझीलंडला व्हाईटवॉश, टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी

टीम इंडियाने नवा इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यात भारतानं 7 धावांनी विजय मिळवला. तसंच टीम इंडियानं न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे.

IND vs NZ, 5th T20I
होम ग्राऊंडवर न्यूझीलंडला व्हाईटवॉश,भारताची ऐतिहासिक कामगिरी  |  फोटो सौजन्य: Twitter

माउंट माउंगानुई: टीम इंडियाने नवा इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यात भारतानं 7 धावांनी विजय मिळवला. तसंच टीम इंडियानं न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे.  न्यूझीलंडच्या होम ग्राऊंडवरच टीम इंडियाने अशाप्रकारे व्हाईटवॉश देत ऐतिहासिक कामगिरी केली.  भारतानं न्यूझीलंडला 164 आव्हानं दिलं होतं.  त्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड 20 ओव्हरमध्ये 156 धावा केल्या. या विजयासह भारतानं पाच सामन्यांची सीरिज 5-0 नं जिंकली. 

टीम इंडियानं सीरिजमध्ये न्यूझीलंडला एकाही सामन्यात विजय मिळवून दिला नाही. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या T20 सामन्यात टीम इंडियानं टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ओपनर लोकेश राहुल आणि रोहित शर्माच्या आक्रमक खेळाच्या जोरावर टीम इंडियानं पाचव्या आणि अखेरच्या T20I सामन्यात 3 बाद 163 धावा केल्या. विजयासाठी न्यूझीलंड टीमला 164 धावांची गरज होते. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात अत्यंत वाईट झाली. न्यूझीलंडचा ओपनर मार्टिन गप्टिल अवघ्या 2 धावा करून माघारी परतला. 

त्यानंतर कॉलिन मुन्त्रोनं 15 तर टॉम ब्रूस रनआऊट झाला. तो शून्यावर पॅव्हेलियनमध्ये गेला. टीम सेफर्ट आणि रॉस टेलरनं टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण सेफर्टनं 30 बॉलमध्ये अर्धशतकी केली. रॉस टेलरनं 47 बॉलमध्ये 53 धावा केल्या. मात्र नवदीप सैनीच्या बॉलवर सेफर्ट आऊट झाला. टेलरव्यतिरिक्त मैदानात न्यूझीलंडच्या टीम सावरण्यासाठी उतरलेल्या डॅरेल मिशेल, मिशेल स्टॅनर, स्कॉट कुगेलेइन यांना खेळ सावरता आला नाही.

सैनी, वॉशिंग्टन सुंदर आणि बुमराह यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझींलडचे बॅट्समन टिकाव धरू शकले नाहीत. त्यामुळे न्यूझीलंड टीमची अवस्था 20 ओव्हरमध्ये 9 बाद 156 अशी झाला आणि यामुळेच टीम इंडियाचा 7 धावांनी विजय झाला.  टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर यांनी दोन तर वॉशिंग्टन सुंदरनं एक विकेट घेतली.

पाचव्या T20 सामन्यात टीम इंडियाच्या संघात थोडासा बदल करण्यात आला होता. कॅप्टन विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे रोहित शर्मानं सामन्याचं नेतृत्त्व केलं. त्यामुळे केएल राहुल आणि संजू सॅमसन यांनी या खेळाची सुरूवात केली आणि तिसऱ्या क्रमाकांवर रोहित शर्मा खेळायला आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी