IND VS NZ: संकटात आलेय चेतेश्वर पुजाराचे करिअर! हे खेळाडू घेऊ शकतात जागा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 01, 2021 | 18:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs New Zealand Test serise : भारत आणि न्यूझीलंड यंच्यात कानपूरमध्ये खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना रोमहर्षक पद्धतीने अखेर अनिर्णीत ठरला. या सामन्यात एका खेळाडूने खराब कामगिरी केली ज्यामुळे त्याचे करिअर धोक्यात आले आहे. 

cheteshwar pujara
IND VS NZ: संकटात पुजाराचे करिअर! हे खेळाडू घेऊ शकतात जागा 
थोडं पण कामाचं
  • धोक्यात आले आहे पुजाराचे करिअर
  • मुंबईत होणार दुसरा कसोटी सामना
  • पहिला सामना झाला अनिर्णीत

cheteshwar pujara । मुंबई: भारतीय क्रिकेट संघात(indian cricket team) खेळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र टीम इंडियात(team india) स्थान मिळवणे तितके सोपे नसते. त्याहूनही कठीण म्हणजे संघातील आपले स्थान कायम राखणे. कधी भारताची मजबूत वॉल म्हणून ज्या खेळाडूला संबोधले जाई तो चेतेश्वर पुजारा(cheteshwar pujara) सध्या खराब फॉर्मात आहे. त्याची बॅट सध्या शांत आहे. अशातच अनेक युवा क्रिकेटर(young cricketer) त्याची जागा घेण्यासाठी तयार बसले आहेत. (IND VS NZ: cheteshwar pujara career is in trouble, this player can take place of pujara in team india )

पुजाराची बॅट शांत

चेतेश्वर पुजारा गेल्या अनेक दिवसांपासून फॉर्ममध्ये दिसत आहे. पुजारा धावा करण्यासाठी योग्य फॉर्मची प्रतीक्षा करतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पुजारा आपल्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरला. पहिल्या डावात त्याने २६ आणि दुसऱ्या डावात केवळ २२ धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने २०१९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक ठोकलेले नाही. भारतीय निवड समितीने त्याला अनेक संधी दिल्या. पुजाराने भारतासाठी खेळलेल्या ९१ कसोटी सामन्यांमध्ये ६५४२ धावा केल्या. 

श्रेयस अय्यर

न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरला निवडण्यात आले. पहिल्या कसोटी सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचे अय्यरने पुरेपूर फायदा घेतला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अय्यरने पहिल्या डावात १०५ धावा आणि दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या. त्याला या कामगिरीमुळे मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. अय्यर तीन वर्षांपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा भाग आहे. तो पहिल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. लाल बॉलच्या क्रिकेटमध्ये अय्यर दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराची जागा घेऊ शकतो. 

सूर्यकुमार यादव

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापतग्रस्त लोकेश राहुलच्या जागी सामील करण्यात आले आहे. आतापर्यंत त्याने कसोटीत पदार्पण केलेले नाही. मात्र या फलंदाजाने डोमेस्टिक स्तरावर ७७ सामन्यांमध्ये ५३२६ धावा केल्या आहेत. यात दुहेरी शतकाचाही समावेश आहे. सूर्यकुमार आपल्या जबरदस्त फलंदाजीसाठी ओळखला जातो. जेव्हा सूर्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा समोरच्या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवू शकतो.  

दुसऱ्या कसोटीतून रहाणेचा पत्ता कट

पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे  पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. दरम्यान, कोच राहुल द्रविड रहाणेच्या खराब फॉर्ममुळे चिंतेत आहेत. त्यांनी रहाणेचा बचाव करताना म्हटले की तो लवकरच फॉर्ममध्ये परतेल. (IND VS NZ: cheteshwar pujara career is in trouble, this player can take place of pujara in team india)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी