IND vs NZ : मार्टिन गुप्टिलचा बळी घेतल्यावर दीपक चहरचा लूक व्हायरल, अमेझिंग मोमेंट अवॉर्डने गौरव

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 18, 2021 | 16:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs NZ: Deepak Chahar's look goes viral after Martin Guptill's dismissal, honored with Amazing Moment Award भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन टी २० मॅचच्या मालिकेतील पहिली मॅच भारताने जिंकली. मॅच दरम्यान, १८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पुढच्याच चेंडूवर दीपकने गुप्टिलला बाद केल्यावर त्याची रिएक्शन जोरदार व्हायरल झाली.

IND vs NZ: Deepak Chahar's look goes viral after Martin Guptill's dismissal, honored with Amazing Moment Award
IND vs NZ : मार्टिन गुप्टिलला बाद केल्यानंतर दीपक चहरचा लूक व्हायरल, अमेझिंग मोमेंट अवॉर्डने गौरव  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मार्टिन गुप्टिलला बाद केल्यानंतर दीपक चहरचा लूक व्हायरल झाला,
  • दीपकने गुप्टिलला झेलबाद करताना बराच वेळ त्याच्याकडे पाहिलं
  • दीपकला 'अमेझिंग मोमेंट अवॉर्ड' देखील देण्यात आला.

IND vs NZ जयपूर : T20 विश्वचषकातील निराशा मागे टाकून भारतीय संघाने बुधवारी पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला.भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन टी २० मॅचच्या मालिकेतील पहिली मॅच भारताने जिंकली. विजयाने शुभारंभ करत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मॅच दरम्यान, १८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पुढच्याच चेंडूवर दीपकने गुप्टिलला बाद केल्यावर त्याची रिएक्शन जोरदार व्हायरल झाली. (IND vs NZ: Deepak Chahar's look goes viral after Martin Guptill's dismissal, honored with Amazing Moment Award)

जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या विजयाचे नायक होते नवे कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरला जबर फटका बसला, ज्यात त्याच्या चार षटकात 42 धावा झाल्या. या सामन्यात त्याला एकमेव विकेट न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज मार्टिन गप्टिलची मिळाली, जो 42 चेंडूत 70 धावांची धडाकेबाज खेळी खेळून बाद झाला. न्यूझीलंडच्या डावाच्या १८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पुढच्याच चेंडूवर दीपकने गुप्टिलला बाद केल्यावर त्याची रिएक्शन जोरदार व्हायरल झाली.

खरं तर, त्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर गप्टिलने दीपककडे एकटक पाहिलं होतं, ज्याच्या प्रत्युत्तरात दीपकने गुप्टिलला झेलबाद करताना बराच वेळ त्याच्याकडे पाहिलं. सामना संपल्यानंतर, दीपकला गप्टिलकडे पाहिल्याबद्दल 'अमेझिंग मोमेंट अवॉर्ड' देखील देण्यात आला. या सामन्यात भुवनेश्वर कुमार वगळता इतर वेगवान गोलंदाजांना या सामन्यात फारसे काही दाखवता आले नाही, त्यामुळे न्यूझीलंड संघाने प्रथम खेळताना सहा गडी गमावून १६४ धावा केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी